व्हिएतनाम येथील बौद्ध भंते व बौद्ध धम्म प्रचारकांच्या हस्ते 1200 बौद्ध मूर्तींचे वितरण
– विदर्भ तसेच भोपाळ (मध्य प्रदेशात) भव्य कार्यक्रम आयोजित
– फिल्म अभिनेता गगन मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम
– गगन मलिक फाउंडेशनद्वारा कार्यक्रम आयोजित
नागपूर :- आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, चित्रपट अभिनेते, बौद्ध नेते, गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री गगन मलिक यांच्याकडून संपूर्ण भारतात 84 हजार बुद्ध मूर्तीं वितरणाचा मेगा प्रोजेक्ट सुरू आहे. त्यासाठी व्हिएतनाममधील बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्मगुरु तसेच मध्य प्रदेशातील बुद्धिस्ट धम्म प्रचारक लोकांचे एक शिस्टमंडळ विदर्भ आणि भोपाळमध्ये येत आहे.

गगन मलिक फौंडेशनच्या विद्यमाने नागपूर (कोरडी), वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, आर्वी आणि भोपाळ (मध्य प्रदेश) या शहरांमध्ये फाउंडेशनतर्फे वैयक्तिकरित्या तब्ब्ल 1200 बौद्ध मूर्तींचे नि:शुल्क वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरात 111 बौद्ध मूर्तींचे नि:शुल्क वितरण होईल. यासाठी व्हिएतनाम येथील बौद्ध भंते व बौद्ध धर्मविलंबी 10 सप्टेंबर 2022 रोजी नागपुरात दाखल होणार आहेत. 11 सप्टेंबरपासून मूर्ती वितरण होणार आहे. यात प्रामुख्याने व्हिएतनामचे सिस्टर व्हीनली व त्यांच्यासह २८ बौद्ध भन्ते उपस्थित राहतील.
चित्रपट अभिनेते गगन मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील वर्धा, अकोला, आर्वी, यवतमाळ, चंद्रपूर, कोराडी आणि भोपाळ येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन परदेशातून येणार्या बौद्ध भिक्खू व बौद्ध धर्मगुरूंच्या प्रवचनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन गगन मलिक फाउंडेशनचे समन्वयक नितीन गजभिये यांनी केले आहे.

सर्व नागरिकांना विनंती आहे की, गगन मलिक फाऊंडेशनचे सदस्यत्व घ्या आणि धम्मकार्यात आपला सहभाग सुनिश्चित करा.
कार्यक्रमाची रूपरेषा….
रविवार, 11 सप्टेंबर 2022, सकाळी 10 वाजता, स्थळ – सरोज मंगलम, सानेवाडी, राष्ट्रभाषा रोड, वर्धा.
रविवार, 11 सप्टेंबर 2022, सायं. 5 वाजता, स्थळ- आम्रपाली बुद्ध विहार, आम्रपाली नगर, आलसना रोड, शेगाव, जिल्हा अकोला.
सोमवार 12 सप्टेंबर 2022, सकाळी 10 वाजता, स्थळ- रोशन सेलिब्रेशन हॉल, वर्धा रोड आर्वी जिल्हा वर्धा.
सोमवार 12 सप्टेंबर 2022 दुपारी 3 वाजता, स्थळ- संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती.
मंगळवार 13 सप्टेंबर 2022 दुपारी 4 वाजता, यवतमाळ.
बुधवार 14 सप्टेंबर 2022 दुपारी 4 वाजता, स्थळ- प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर.
गुरुवार 15 सप्टेंबर 2022 सायं., 5 वाजता, अनाथपिंडक बौद्ध विहार कोराडी.
शनिवार 17 सप्टेंबर 2022 दुपारी 12 वाजता, स्थळ- हंसध्वनी सभागृह, रवींद्र भवन पॉलिटेक्निक चौक, भोपाळ(मध्य प्रदेश)
पत्रपरिषदेला उपस्थित गुणवंत सोनटक्के, रुपेश पाटील, वर्षा मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
