युवक काँग्रेसतर्फे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन – शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

0
66

युवक काँग्रेसतर्फे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन
– शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
नागपुर –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मध्य नागपुरातील कसाबपुरा, नालसाहब रोड मोमीनपुरा येथे ‘हर मतदाता जोडेगा आधार’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते झाले.
शिबिरात मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, ई-श्राम कार्ड तयार करणे, तसेच युवक काँग्रेसचे सदस्यता नोंदणी अर्ज भरणे आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 

याप्रसंगी कुरेशी समाजाचे मुख्य हाजी अब्दुल कदीर, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व गुजरातचे प्रभारी अजित सिंग, शहर काँग्रेसचे महासचिव अतिक कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, आयोजक फजलूरहमान कुरेशी, शहर युवक काँग्रेसचे अझहर शेख, नकील अहमद, जैद कुरेशी, राकेश इखार, निलेश खोब्रागडे, अनुप धोटे, सचिन वसनिक, दानिश अली, विलियम साख़रे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here