राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

 

राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

नागपुर – दिनांक 28 ऑगष्ट रोजी राजीव नगर मैदानात सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे दक्षिण पश्चिमचे मंत्री किशोर चन्ने यांच्या नेतृत्वात व मित्रमंडळींच्या सहकार्याने तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे भजन मंडळाचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश भोयर माजी स्थायी समिती अध्यक्ष, मीनाक्षीताई तेलगोटे, माजी विधी सभापती पल्लवीताई श्यामकुळे, माजी लक्ष्मीनगर झोन सभापती लहुजी बेहते, माजी नगरसेवक वनिताताई दांडेकर, माजी नगरसेविका रमेश गिरडे, रमेश दलाल, एडवोकेट उदय डबले, प्रशांत आकांत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी सर्वमान्यवरांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व आपआपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती गीताने करण्यात आली. आरोग्य शिबिरात 165 लोकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर चन्ने मित्र परिवार यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक किशोर चन्ने यांनी तर संचालन विजूताई गद्रे यांनी केले व आभार प्रा.सचिन काळबांडे यांनी मानले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts