पिवळी नदी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा
– चिमुकल्यांची वेशभूषा ठरले आकर्षण
नागपुर – रमाई आंबेडकर संघर्ष समितीच्या विद्यमाने पिवळी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषा आकर्षणाचे केंद्र होते. नंदीबैलाच्या आकर्षक सजावटीला पुरस्कार देण्यात आला.
प्रभाग 3 चे माजी ज्येष्ठ नगरसेवक परसराम मानवटकर यांच्या हस्ते पूजन करून पोळ्याला सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व माजी शिक्षक किशोर मेश्राम, आयोजक राजू नगरारे, वरिष्ठ पत्रकार व अधिक्षक शेखर गजभिये, शरद गणवीर, हरिदास खोब्रागडे उपस्थित होते. शंभरहून अधिक चिमुकल्यांना प्रसाद वितरण करून तान्हापोळा उत्सव साजरा झाला.
यशस्वीतेसाठी राहुल वासनिक, संतोष तिवारी, खिलावण लांजेवार, शाम भोयर, शुभम वालोंद्रे निखिल भोयर, सचिन मेश्राम, मनीष वासनिक, राहुल वासनिक, बबलू, मुन्ना रामटेके, अंकुश कोलते, प्यारेलाल वैद्य, आशिष नंदागवळी, भूषण मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply