अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार
मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२२:- भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयआणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणचा दोन पुरस्कारांनी गौरव केला आहे.

एआरईएएसच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केरळ राज्यातील कोचीन येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमाप्रसंगी एएनईआरटी आणि एआरईएएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च रूफटॉप सौर ऊर्जा स्थापित क्षमता प्राप्त करणे आणि २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी महावितरणला दोन पुरस्कार मिळाले असून केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री ना. श्री भगवंत खुबा यांच्या शुभहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे आणि संचालक (वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्विकारले.

 

याशिवाय महाराष्ट्राची नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लांट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्यासाठी दोन पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले.हा पुरस्कार महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री सूरज वाघमारे यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमाला केरळचे ऊर्जामंत्री ना. श्री के. कृष्णनकुट्टी, भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री आय एस चतुर्वेदी तसेच केरळ राज्याच्या ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि एएनईआरटी आणि एआरईएएसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी रूफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक यावा यासाठी रूफटॉप घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.रूफटॉप वापराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी या पुरस्काराबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts