भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट
दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा , भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह इतर मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेतले.बावनकुळे हे ओबीसी नेते असल्याने त्यांना विशेष महत्व शाह यांनी दिले. बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सोबत सुद्धा पक्षाचे बांधनी विषयी चर्चा केली. नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली.व त्यांना नड्डा यांनी मार्गदर्शन केले.
बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष जी, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ही आशीर्वाद घेतला.
राज्यात पुढे विधानसभा निवडणुका आहे. अश्या वेळी नाराज ओबीसी समाज आता बावनकुळे यांच्या माध्यमातुम भाजपा च्या पाठीशी उभा राहिल.
Leave a Reply