नागपुरातील नवीन सुभेदार ले-आऊट येथील स्व. शहिद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन..!
माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती
नागपूर :- भारतीय संस्कृती चे प्रतिक जगाचा पोशिंदा महाराष्ट्राचा मानबिंदू शेतकरी यांच्या संमानार्थ, पारंपारिक संस्कृतीची जोपासना व्हावी, बाल गोपालांचा उत्साह व्दिगुणीत व्हावा या उद्देशाने नवीन सुभेदार परिसरात नागमंदिर येथे शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक दिपक कापसे यांच्यातर्फे स्व. शहिद विजयभाऊ कापसे स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ ला दुपारी ४ वाजता, नविन सुभेदार नागमंदिर येथे करण्यात आलेला आहे. स्व. शहिद विजय कापसे हे पोलीस खात्यात कामगिरीवर कर्तव्य करत असतांना शहीद झाले होते.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपराजधानीतील भव्य तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात येते. मागील २७ वर्षापासून या तान्हया पोळयाच्या उत्सवाला सुरूवात झाली व आज २८ व्या वर्षात पर्दापण करतांना या लहानश्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या तान्हया पोळयात परिसरातील जवळपास २० हजार नागरीक व ५ ते ६ हजार बालक सहभागी होतात. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या तान्हा पोळयाच्या उत्सवामुळे न्यु सुभेदार या परिसरात एक उत्कृष्ठ सामाजिक व सांस्कृतीक व्यासपीठ लाभलेले आहे.
उपराजधानीतील सर्वात मोठया भव्य तान्हा पोळा म्हणून या उत्सवाचे नावलौकीक आहे. या महोत्सवात प्रथम ३ नंदी पुरस्कार (प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रू. ५,५५५/-, तृतीय पुरस्कार रू. ३,३३३/-) विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ नंदी विजेत्यांना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल. तसेच प्रथम ३ वेशभुषा पुरस्कार (प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रू. ५,५५५/-, तृतीय पुरस्कार रू. ३,३३३/-) प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ वेशभुषा विजेत्यांना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल. व सहभागी प्रत्येक बालकांना भेटवस्तु व २०रू. रोख रक्कम भेट स्वरूपात देण्यात येईल. या उत्सवात बलुन शो, पेपर ब्लॉस्ट शो, ऊंट, घोडा शो, कार्टन शो तसेच ढोल ताशा व ध्वज पथक नवीन सुभेदार आखाडा, शिवकालीन युध्दकला प्रात्याक्षिका आहे. उपराजधानीतील या भव्य तान्हा पोळा उत्सवात विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. आदित्य ठाकरे, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या भव्य तान्हा पोळा उत्सवात नागरीक व बाल गोपालांनी उत्साहाने मोठया संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक दिपक कापसे यांनी केले आहे.
Leave a Reply