वाडी नगर परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला धक्का !
-हर्षल काकडे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने ‘वाडीत सर्वात मोठा राजकीय स्फोट’
-भाजप,काँग्रेस आमने-सामने, उबाठा गटात खळबळ,वाडीच्या राजकारणात मोठा भूचाल!
वाडी प्रतिनिधी WH NEWS
वाडी नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारचा दिवस अक्षरशः सुपर पॉलिटिकल थ्रिलर ठरला. कारण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – उबाठा) चे आक्रमक, भक्कम आणि सर्वात चर्चित चेहरे म्हणून ओळखले जाणारे हर्षल काकडे यांनी अचानक नगराध्यक्षपदाचे नामांकन मागे घेतले. ही बातमी समोर येताच उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण वाडीच्या राजकारणात भू-स्खलन सुरू झाले.
ज्या काकडे यांना उबाठाचा सर्वात मजबूत चेहरा, सर्वात आक्रमक उमेदवार मानले जात होते, त्या काकडे यांनी अचानक मागे हटणे म्हणजे निवडणुकीचे तापमान थेट उकळीवर पोहोचले.
आता सर्वात मोठा प्रश्न?
हर्षल काकडे यांनी पर्चा शेवटच्या क्षणी कोणासाठी सोडला? कोणत्या दबावात? की एखाद्या मोठ्या डीलचा भाग म्हणून?
हा प्रश्न वाडीच्या चहाच्या टपऱ्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत आगीसारखा पसरला आहे.
अलीकडील मुलाखतीत म्हणाले होते – “मी मागे हटणार नाही!”
काही दिवसांपूर्वी एका युट्युब न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काकडे म्हणाले होते की ते कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आणि मागे हटणार नाहीत.
परंतु, अचानक झालेल्या या ‘पलटी’ने संपूर्ण वाडी स्तब्ध झाली आहे.
अलीकडेच केलेल्या काकडे यांच्या वाढदिवसाच्या शक्तीप्रदर्शनाने त्यांची ताकद दाखवली होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला शो राजकीय दबाव निर्मिती म्हणून पाहिला गेला. पण, त्याच काकडे यांनी नामांकन मागे घेतल्यानंतर वाडीच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
‘बॅकडोर डील’च्या चर्चांना उधाण – राजकीय गलियारांमध्ये तापलेले वातावरण
काकडे यांची भाजप आमदार समीर मेघे यांच्याशी जवळीक सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे
हा निर्णय एखाद्या मोठ्या बॅकडोर डीलचा भाग आहे का?
किंवा रणनीतिक समझोता?
की एखादे गुप्त राजकीय कॉम्बिनेशन?
कुणालाच ठोस माहिती नाही… पण अफवा वेगाने फिरत आहेत.
उबाठा गटाला मोठा झटका – सर्वात दमदार चेहरा मैदानाबाहेर!
उद्धव ठाकरे गटासाठी हा स्पष्टपणे मोठा धक्का मानला जात आहे.
काकडे हे वाडीतील उबाठाचे ओळखले जाणारे, आक्रमक आणि लोकप्रिय नेते होते.
काही शिवसैनिकांनी तर नाराजी व्यक्त करत उबाठा सोडून शिंदे गटाचा धनुष्य-बाण हातात घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गतीने पसरू लागली आहे.
आता वाडीत थेट ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ सामना!
काकडेांनी माघार घेताच वाडीतील संपूर्ण राजकीय हवामान बदलले आहे.
आता लढत थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दोन धुरंधरांमध्ये सिमटली आहे.
उबाठासह छोटे पक्ष आणि इतर घटकांची ताकद एकदम ढासळल्याचे चित्र आहे.
नागरिकांमध्ये संताप “हे पचनी पडत नाही!”
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला अप्रत्याशित, धक्कादायक आणि सामान्य नसलेला मोठा राजकीय गेम असे संबोधले आहे.
संपूर्ण शहरात एकच चर्चा
हर्षल काकडे एवढे लढाऊ नेते अचानक का माघारी?
वाडीच्या सियासतवर नवीन वादळ – नवीन समीकरणे, नवीन गठबंधनाची सुरुवात?
काकडे यांची माघार वाडी निवडणुकीतील सर्वात मोठा पॉलिटिकल बॉम्ब ठरत आहे.
या निर्णयाने आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे, अनपेक्षित गठबंधन आणि आणखी मोठे ट्विस्ट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
वाडी नगर परिषद निवडणूक आता अधिकच रोमांचक, तणावपूर्ण आणि थरारक बनली आहे.
एका मुलाखत मध्ये काकडे म्हणाले लढणारच मात्र आता अचानक अर्ज का मागे घेतला? आपले सदस्य वाचावायचे आहे म्हणून तर अर्ज मागे घेतला नाही? मात्र अध्यक्ष पद सोडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वाडीतील राजकारण संपवले असे मत राजकीय विश्लेक्षक यांनी मांडले!
