Category: विदर्भ

  • आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास  -स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन -केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांची उपस्थिती

    आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास -स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन -केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांची उपस्थिती

    आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

    -स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन
    -केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांची उपस्थिती

    नागपूर WH NEWS – आरोग्याच्या क्षेत्रात सेवेसोबतच संवेदनेलाही तेवढेच महत्त्व आहे. नितीनजींकडे सेवा आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून गरिबांची सेवा करण्याचा विचार त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पुज्य भंते श्री. आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्री. राघवेंद्र स्वामी, महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक श्री. राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘स्व. भानुताई गडकरी यांच्याकडून नितीनजींना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच ते देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकत आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीचे कल्याण हा नितीनजींच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. उपेक्षितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने काम करीत आहेत. उद्योग, कृषी, आरोग्य क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. याच मालिकेत डायग्नोस्टिक सेंटरचा समावेश होतो. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे खूप मोठे पाऊल आहे.’

    एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात विकसित तंत्रज्ञानाचा वापर वाढला असताना सेवांचे शुल्क देखील जास्त आहे. अशात एमआरआय आणि सिटी स्कॅनच्या मशीन्स भारतीय बनावटीच्या असतील तर सेवांचे शुल्क देखील कमी राहील, असेही ते म्हणाले. त्याचवेळी भविष्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी लागणार असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे नेटवर्क निर्माण करण्याचे नियोजन झाले आहे. पुढील चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच सिकलसेल, थॅलेसिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    आईच्या संस्कारांमुळेच डायग्नोस्टिक सेंटरची प्रेरणा – ना. श्री. गडकरी

    ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘आईचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. आजपर्यंत मी जे काही करू शकलो ते आईचे आशीर्वाद आणि तिच्या संस्कारांमुळेच शक्य झाले. प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरिबांची सेवा करण्याचे संस्कार आईने मला दिले. त्यामुळे मी पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजपर्यंत हजारो हार्ट ऑपरेशन्स करू शकलो. समाजातील वंचितांची, शेवटच्याच्या माणसाची सेवा करण्याचे, त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा अंत्योदयाचा विचार पं. दिनदयाल उपाध्याय यांनी दिला. त्या मार्गावर सातत्याने कार्य करीत आहे.’ राष्ट्रकारण, समाजकारण आणि सेवाकारण, हाच राजकारणाचा खरा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या कार्यातून गरिबांचे जीवन कसे बदलू शकतो, याचा विचार मी करत असतो. त्याच प्रेरणेतून अनेकांच्या सहकार्याने स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना होऊ शकली आहे. ज्या आईने जन्म दिला तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकलो याचे समाधान आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. हे केंद्र व्यवसायाचे नव्हे तर सेवेचे माध्यम आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिकलसेल, थॅलेसिमिया आणि बोन मॅरोच्या उपचाराचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले.

    देशातील पहिले मेड इन इंडिया डायग्नोस्टिक सेंटर – डॉ. जितेंद्र शर्मा
    एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा म्हणाले, ‘स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे देशातील पहिले केंद्र आहे, जिथे प्रत्येक मशीन मेड इन इंडिया आहे. आजपर्यंत कोणत्याही हॉस्पिटलपुढे मेड इन इंडियाचा फलक लागला नाही. आम्ही यात छोटासा सहभाग नोंदवू शकलो, हे भाग्य समजतो.’ आपल्या देशात ६४ हजार कोटींची वैद्यकीय उपकरणे आयात होतात. हा आर्थिक भार कमी करण्याच्याच उद्देशाने आमच्या संस्थेची २०१८ मध्ये विशाखापट्टणम स्थापना झाली होती. नितीनजींच्या सहकार्याने १५ हजार कोटींची वैद्यकीय उपकरणे बनवायला सुरुवात केली आहे. एमआरआय ६ कोटींमध्ये बाहेरून विकत घेतले जायचे, आज २ कोटींची उपकरणे आपण बनवतोय आणि निर्यातही करतोय. भारतातील पहिले सिटी स्कॅन, एमआरआय आम्ही बनवतो. नितीनजी केंद्रीय मंत्री म्हणून जेवढे काम करतात, त्यापेक्षा जास्त काम एक चांगला माणूस असल्यामुळे करू शकत आहेत, असेही ते म्हणाले.

    स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण केले – स्वामी राघवेंद्र जी
    स्वामी राघवेंद्र जी म्हणाले, ‘नितीनजींनी स्वामी विवेकानंदांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी जमशेदजी टाटा यांना म्हटले होते की विदेशातील तंत्रज्ञान भारतात आणून आपण उत्पादन करू शकत नाही का? आज डायग्नोस्टिक सेंटरच्या निमित्ताने त्याचे साक्षात उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे नितीनजी आणि जितेंद्र शर्मा यांना विवेकानंदांचे विशेष आशीर्वाद मिळत आहेत.’

    केंद्राच्या माध्यमातून पुण्याचे कार्य – भंते आनंद थेरा जी
    भंते आनंद थेरा जी म्हणाले, ‘भगवान बुद्ध म्हणतात, ‘आरोग्य परमा लाभा, सन्तुट्ठि परमं धनं। विस्सासपरमा ञाती, निब्बानं परमं सुखं।।’. अर्थात जीवनात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. शरीरासह मनाचेही आरोग्य आवश्यक आहे. नितीनजींनी आपल्या आईच्या नावाने हे केंद्र सुरू केले, ही खूप मोठी पुण्याची बाब आहे. इथे रोज चांगले कार्य होणार आहे आणि त्यासाठी आईंचे आशीर्वाद मिळत राहतील.’

    यांचा झाला विशेष सत्कार
    डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी विशेष परिश्रम घेणारे माजी नगरसेवक प्रभाकर येवले, आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठी संतोष यादव, प्यारे खान, अंबादास देशमुख (किशोर अवर्सेकर यांच्यावतीने), डॉ. विरल कामदार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यासोबतच विशाखापट्टणमच्या एएमटीझेड कंपनीचे साई किरण, अभिषेक सिरसकर, मिनल मारावार, दिप्ती चौहान, फरीद अली, बरनाली हजारिका तर सिक्विया हेल्थकेअरचे श्री. विश्वनाथन, डायकेअरचे अजित मिश्रा, ट्रूव्हिस लिमिटेडचे विवेक तिवारी, ट्रान्सएशियाचे चेअरमन सुरेश वझिरानी, लिटररी स्कॉलर फॉर हेल्थकेअरचे सुधीर सक्सेना यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

    कार्यक्रमा करिता यांचे विशेष परिश्रम
    स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी विशेष परिश्रम घेणारे श्री. रमेश मानकर, डॉ. राजीव पोतदार, श्री. निखील गडकरी, श्री. सारंग गडकरी, श्री. अविनाश घुशे, श्री. अतुल मंडलेकर, श्रीकांत गडकरी, कवडू झाडे, हेमंत गडकरी, संजय टेकाडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

    स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची वैशिष्ट्ये

    • 6000 चौरस फूटांचे बांधकाम
    • वेटिंग एरियासह संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा
    • पूर्णपणे पेपरलेस कार्यप्रणाली
    • उच्च क्षमतेचे सर्व्हर्स
    • तांत्रिकदृष्ट्या पात्र व प्रशिक्षित कर्मचारी

    एमआरआय (MRI)
    • मेड इन इंडिया मशिन्स
    • 1.5 टेस्ला हाय-एंड इमेजिंग, 16 चॅनल
    • MUSIC तंत्रज्ञानामुळे जलद स्कॅन शक्य, इमेज क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नाही

    सीटी स्कॅन (CT Scan)
    • मेड इन इंडिया मशिन्स
    • मोठी शरीरयष्टी असलेल्या रुग्णांसाठी मोठे बोअर
    • कमी वेळात स्कॅन – संपूर्ण छातीचे स्कॅन फक्त 6 सेकंदांत
    • BIS, AERB, CDSCO मान्यताप्राप्त

    डिजिटल एक्स-रे (Digital X-Ray)
    • उच्च दर्जाची डिजिटल एक्स-रे सेवा

    डायलिसिस (Dialysis)
    • 5 उच्च दर्जाच्या डायलिसिस मशिन्स

  • शाक्यभूषण मित्र परिवार सेवाग्रामतर्फे ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन’ व बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

    शाक्यभूषण मित्र परिवार सेवाग्रामतर्फे ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन’ व बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

     


    शाक्यभूषण मित्र परिवार सेवाग्रामतर्फे ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन’ व बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

    वर्धा सेवाग्राम (ब्युरो) – शाक्यभूषण मित्र परिवार, सेवाग्राम यांच्या वतीने आयोजित ‘गुरु-शिष्य स्नेहमिलन आणि बुद्ध-भीम गीतांचा आषाढी पौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि सामाजिक एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, सामाजिक समतेचे मूल्य आणि धम्मविचारांची प्रेरणा उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आली.

    कार्यक्रमाची सुरूवात वंदनगीताने करण्यात आली, जे कवी, गायक विनोद बाबू कांबळे (मनचला) यांनी सादर केले. त्यांच्या सुमधुर गायनाला संगीत संयोजक छोटू भुजाडे व त्यांच्या संचाने दिलेली साथ मंत्रमुग्ध करणारी ठरली.

    कार्यक्रमात अनेक प्रभावी बुद्ध-भीम गीते सादर करण्यात आली. त्याचा समारोप परमानंद भारती यांच्या हृदयस्पर्शी गीताने झाला, ज्याने वातावरण भारावून गेले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक भोंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन रविभाऊ गणविर यांनी केले.

    या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मा. राहुल थुल, नागसेन मानकर, रविभाऊ गणविर, दिनेश ताकसांडे, छोटू भुजाडे, पिंटू भोंगाडे, देवानंद कांबळे, पंकज भुजाडे, गौतम सोनटक्के, नंदू जवादे, सोनू मेश्राम यांचे विशेष योगदान लाभले.

    धम्म, संस्कृती व एकतेचा संगम ठरलेला हा महोत्सव सेवाग्राममध्ये कायम स्मरणात राहील, अशी उपस्थितांची भावना होती.


     

  • सात दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी; अन्यथा आमरण उपोषण – शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांचा इशारा

    सात दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी; अन्यथा आमरण उपोषण – शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांचा इशारा

    सात दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी; अन्यथा आमरण उपोषण – शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांचा इशारा

    नागपूर वाडी (15 जूलै) – मागील दोन वर्षांपासून वाडी शहरात सुरू असलेल्या भूमिगत सिव्हरेज लाईनच्या कामामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची दैना उडाली आहे. मँगोकीया ब्रदर्स प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीमार्फत नगरपरिषदेच्या देखरेखीखाली सुरू असलेले हे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

    शहरातील सुदृढ काँक्रीट व डांबरी रस्त्यांची खोदाई करून, नाल्या अपूर्ण व निकृष्ट दर्ज्याने बुजवण्यात आल्यामुळे संपूर्ण वाडी शहरात लांबच लांब, रुंद आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. नुकत्याच झालेल्या ७ ते १० जुलैदरम्यानच्या सततधार पावसामुळे या कामाचे घोटाळे उघड झाले असून नागरिकांना गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांनी ठेकेदार व वाडी नगर परिषदेच्या बांधकाम विभागावर रोष व्यक्त केला. त्यांनी मुख्याधिकारी मा. ऋचा धाबर्डे यांच्याकडे निवेदन देत, दत्तवाडी चौक ते हरिओम सोसायटी तसेच दत्तवाडी चौक ते रामकृष्ण सभागृह या मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची त्वरित डागडुगी करण्याची मागणी केली आहे.

    सात दिवसांत जर दोषी ठेकेदारावर कारवाई करून रस्ते खड्डेमुक्त केले नाहीत, तर शिवसेना वतीने आमरण उपोषण करण्यात येईल,” असा कडक इशारा माणके पाटील यांनी दिला.

    यावेळी दत्ता कॉम्प्लेक्स ते हरिओम सोसायटीरामकृष्ण सभागृह मार्गावर २० फूट रुंदीचा सिमेंट काँक्रीट पेव्हिंग ब्लॉकसह पक्का रस्ता तयार करण्याची मागणीही करण्यात आली.

    या आंदोलनात उपतालुका प्रमुख भाऊराव रेवतकर, उपशहर प्रमुख उमेश महाजन, वार्ड प्रमुख जगदीश पटले, सुनील पाटील, प्रमोदजी तराळेकर, राजू सहस्त्रबुद्धे, रमेश विलोनकर, राजू रिंके यांच्यासह अनेक त्रस्त नागरिक सहभागी झाले होते.

  • काकांचे अमानवी कृत्य – वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी पुतणीला घराबाहेर फेकले, शिवीगाळ-धमकीप्रकरण midc पोलीस ठाण्यात

    काकांचे अमानवी कृत्य – वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी पुतणीला घराबाहेर फेकले, शिवीगाळ-धमकीप्रकरण midc पोलीस ठाण्यात

    काकांचे अमानवी कृत्य – वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी पुतणीला घराबाहेर फेकले, शिवीगाळ-धमकीप्रकरण midc पोलीस ठाण्यात
    नागपूर | WH NEWS
    वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आधार बनण्याऐवजी पुतणीला घराबाहेर काढण्याचा अमानवी प्रयत्न काकांकडून झाल्याची धक्कादायक घटना एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत रमाबाई नगर जयताळा परिसरात समोर आली आहे. आरोपी काका मोरेश्वर नितनवरे आहे त्यांच्यावर bns कलम 115(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी काका मोरेश्वर नितनवरे व रामेश्वर नितनवरे यांनी पुतणी व तिच्या भावंडांना धमकावून, घरातील सामान बाहेर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील कारवाईसाठी न्यायालयाचा मार्ग दाखविण्यात आला आहे.


    प्राप्त माहितीनुसार, अर्जदार ही प्रगती नितनवरे यांची बहिण असून ती सध्या नागपूर येथील एम.आय.डी.सी परिसरात आपल्या भावासह वडिलोपार्जित घरात राहत आहे. सदर जागेचे हिस्सेवाटप अद्याप झाले नसल्याने न्यायालयात वाद सुरू आहे. या घराची खरेदी अर्जदार हिच्या वडिलांनी केली होती. त्या अनुषंगाने तिला हक्काचा वाटा मिळावा यासाठी तिने न्यायालयात दावा दाखल केला आहे.
    दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रगती नितनवरे ही बहिणीस भेटण्यासाठी घरी आली असता, काका रामेश्वर नितनवरे यांनी अचानक घरी येऊन ‘हे माझ्या वडिलांचे घर आहे, तुला इथे राहायचं नाही’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे शिवीगाळ व धक्काबुक्की करत घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले. यावेळी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही समज न घेता पुन्हा अपमानजनक वर्तन केले.


    या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरी माने यांनी सदर प्रकार हा चडखलपात्र असून अर्जदारास कलम 115(2), 352 BNS नुसार कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.
    याशिवाय, काका मोरेश्वर नितनवरे यांनी घरातील वस्तू अक्षरशः बाहेर फेकून दिल्या व दुसऱ्या काकाने – रामेश्वर नितनवरे – पुतणीच्या भावाला घरी येऊन धमकी दिली की “आम्ही तुला इथे राहू देणार नाही,

    विशेष म्हणजे, हे दोन्ही काका त्यांच्या वडिलांच्या (म्हणजे पुतणीच्या आजोबांच्या) दुसऱ्या घराबाबतही त्याच पद्धतीने पुतणीच्या भावंडांना फसवून, विश्वासात न घेता नावावर करून घेऊन आता त्यावरही हक्क हिरावून घेत आहेत.
    पुतणी प्रगती थूल, मीनाक्षी बोरकर, व भाऊ अमृत ज्ञानेश्वर नितनवरे यांचा दावा आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर काकांनी मदत करायची सोडून उलट त्रास देण्यास सुरुवात केली. आधी दोन्ही काकांमध्ये वाद होता, मात्र आता एकत्र येऊन पुतणीच्या कुटुंबास त्रास देत आहेत.
    या प्रकरणी MIDC पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीही एकमेकांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र आता पुतणीला प्रत्यक्ष धमकी देणे, मारहाण करणे, घराबाहेर काढणे यामुळे प्रकरण गंभीर बनले आहे.

  • यशवंत महाविद्यालय, वर्धा में “विधि व्यवसाय और उसका भविष्य” विषय पर प्रेरणादायक कार्यशाला का आयोजन

    यशवंत महाविद्यालय, वर्धा में “विधि व्यवसाय और उसका भविष्य” विषय पर प्रेरणादायक कार्यशाला का आयोजन

    यशवंत महाविद्यालय, वर्धा में “विधि व्यवसाय और उसका भविष्य” विषय पर प्रेरणादायक कार्यशाला का आयोजन

    वर्धा WH NEWS –  यशवंत महाविद्यालय, वर्धा के विधि विभाग द्वारा “विधि व्यवसाय और उसका भविष्य दृष्टिकोण” विषय पर एक प्रेरक कार्यशाला का आयोजन किया गया। इस अवसर पर मुख्य वक्ता के रूप में अधिवक्ता श्री प्रसाद पद्मकुमार सोईतकार (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एवं सहायक सरकारी वकील, वर्धा) ने विधि छात्रों को अपने अनुभव और मार्गदर्शन से प्रेरित किया।श्री सोईतकार ने विधि छात्रों को Bare Act के गहन अध्ययन और लगन के महत्व पर बल देते हुए कहा कि धैर्य, परिश्रम और समर्पण से विधिक क्षेत्र में सफलता हासिल की जा सकती है।

    उन्होंने अपनी जीवन यात्रा साझा करते हुए बताया कि कैसे उन्होंने 1998 में विधि की पढ़ाई पूरी कर वर्धा में अपनी प्रैक्टिस शुरू की। उन्होंने दीवानी और फौजदारी मामलों के साथ-साथ हिंगणघाट के चर्चित अंकिता जळीत हत्याकांड जैसे महत्वपूर्ण केस में प्रसिद्ध वकील श्री उज्ज्वल निकम के साथ सहायक विशेष अभियोजक के रूप में कार्य किया।कार्यक्रम की अध्यक्षता प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे ने की, जबकि विभागाध्यक्ष डॉ. शिप्रा सिंगम ने छात्रों को इस तरह के आयोजनों से प्रेरणा लेने और विधिक क्षेत्र में सक्रिय रहने का आह्वान किया। कार्यशाला में बड़ी संख्या में विधि छात्रों और शिक्षकों ने भाग लिया।

    मंच संचालन कानून की छात्रा सुश्री तनुजा अनिल चिचघरे ने किया, जबकि आभार प्रदर्शन सुश्री हर्षाली वी. गोड़े ने किया। यह कार्यशाला छात्रों के लिए अत्यंत प्रेरणादायक और ज्ञानवर्धक रही, जिसने उन्हें विधि व्यवसाय में करियर बनाने हेतु नई दिशा और प्रोत्साहन प्रदान किया।

  • स्व. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे मिशन आय ए एस.चे पहिले अध्यक्ष

    स्व. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे मिशन आय ए एस.चे पहिले अध्यक्ष

    स्व. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे
    मिशन आय ए एस.चे पहिले अध्यक्ष

    अमरावती –  आज अमरावतीच्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचा सर्वत्र बोलबाला आहे. डॉ.श्री नितीन धांडे हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी पण दिली आहे. याच अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचा महाराष्ट्रातील मिशन आय ए ए.च्या जळणघळणीत महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्रा.राम मेघे या संस्थेचे अध्यक्ष असतानाची गोष्ट. प्राचार्य बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे या संस्थेचे तेव्हा कोषाध्यक्ष होते. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव श्री नितीन हिवसे आज चालवीत आहेत.

    प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांचा माझा परिचय कवी श्रेष्ठ सुरेश भटांमुळे झाला. सुरेश भट व अण्णासाहेब हे जिवलग मित्र. त्यांच्या तासंतास बैठकी चालायचा. गप्पा गोष्टींना ऊत यायचा. अण्णासाहेबांनी तर एक वेळ चक्क अमरावतीच्यात रेल्वे स्टेशन चौकात सुरेश भटांचा कार्यक्रम ठेवला.. कवितेचा कार्यक्रम आणि तोही रेल्वे स्टेशन चौकात. ही अमरावतीच्या इतिहासात लिहिण्यासाठी गोष्ट आहे. तेव्हा अण्णासाहेबांची रेल्वे स्टेशन चौकात बैठक होती आणि म्हणून त्यांनी रेल्वे स्टेशन चौक निवडला होता .

    प्राचार्य अण्णासाहेब हिवसे एकवेळ मला म्हणाले तुम्ही खूप काम करता .एक वेळ घरी या .मी त्यांच्या घरी गेलो आणि अण्णा साहेबांनी त्यांचे घर आणि त्यांची संस्था आमच्यासाठी मोकळी करून दिली. अण्णासाहेब मदतीला आल्यानंतर आमचे सर्व आर्थिक प्रश्न सुटले .अण्णा साहेबांना या गोष्टीची आवड होती. मिशन आय ए एस.चा पहिला सेमिनार झाला तो अण्णासाहेबांच्या दंत महाविद्यालयातच. आताचे अपर मुख्य सचिव व तेव्हाचे यवतमाळचे जिल्हाधिकारी श्री विकास खारगे याच्या हस्ते त्या चर्चासत्राचे उद्घाटन झाले.. हा पहिला सेमिनार स्पर्धा परीक्षांवर होता. आताचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार तेव्हा नुकतेच आय ए एस झाले होते. महाराष्ट्रातून त्यांचा तिसरा तर देशातून 81 वा क्रमांक होता. ते प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या गाडीत बसेपर्यंत मुलं त्यांना प्रश्न विचारीत होते.. तो काळ असा होता की आयएएस बद्दल कोणालाच फारसे काही माहीत नसायचे.

    अण्णा साहेबांनी त्यांची सगळी महाविद्यालय आमच्या मिशन आय.ए एस.साठी मोकळी करून दिली .कधी दंत महाविद्यालय हो तर कधी अभियांत्रिकी महाविद्यालय तर कधी बडनेरा येथील आरडीआयचे महाविद्यालय तर कधी इर्विन चौकातील महिला महाविद्यालय तेव्हा विद्यापीठ रोडवर असलेले बियाणी चौकातील समाजकार्य महाविद्यालय.. त्यांनी नुसती महाविद्यालये उपलब्ध करून दिले नाहीत .तर त्या कार्यक्रमाला येणाऱ्या खर्चाचा भारही उचलला. हा काळ 2000 सालचा.. तेव्हा आम्ही तरुण होतो. उत्साही होतो .कार्यकर्ते होतो .पण पैसा नव्हता .पण अण्णासाहेबांनी आम्हाला कधीही पैशाची उणीव भासू दिली नाही

    अण्णा साहेबांना लोकांना जेऊ घालण्याचा भारी छंद. स्पर्धा परीक्षा कार्यशाळा असली की ते जेवणाची ऑर्डर देऊन टाकायचे. त्यांच्या बाबु नावाचा कॅटरर होता.. आणि मला सांगायचे काठोळे 200 लोकांची जेवणाची ऑर्डर दिली. मी म्हणायचो अण्णासाहेब एवढे लोक येणार नाहीत ना. अण्णासाहेब म्हणायचे त्याच्यापेक्षा जास्त येतील .माझा अनुभव तुमच्यापेक्षा दांडगा आहे .लोकांना खाऊ पिऊ घाला .तर त्यांना ज्ञान पचनी पडेल आणि पैशाची काळजी करू नका. पेट्रोलचे बिल मी देणार आहे .तुमच्यावर भार पडणार नाही. आणि व्हायचे तसेच .अण्णासाहेबांनी जो अंदाज ठरविलेला असायचा .त्याच्या जवळपास लोक यायचे .तरुण यायचे. त्यांचे आई वडील यायचे. अण्णासाहेब कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रम स्थळीच असायचे. अण्णासाहेब असल्यामुळे त्या त्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी देखील आमच्या दिमतीला असायचे.

    कधी अण्णासाहेब गावात नसले तर कार्यक्रमाची जबाबदारी ते त्यांचे सुपुत्र श्री नितीन यांच्यावर सोपवायचे. नितीन भाऊचा दरारा असायचा .त्यांना सांगितलेले काम ते पटकन कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताबडतोब या स्पीडने करून टाकत होते.. त्यांच्या मदतीला दंत महा.चे डीन डॉक्टर राम ठोंबरे डॉक्टर हरिभाऊ गुल्हाने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री देशपांडे हे असायचे. अण्णासाहेबांनी सोपविलेली जबाबदारी ते समर्थपणे पार पाडायचे.. साहेबांचे सांगणे असायचे .स्पर्धा परीक्षा कार्यशाळा चांगली झाली पाहिजे .मुलं जेवण खाऊन करून गेली पाहिजेत.. तुम्ही पैशाची काळजी करायची नाही. कार्यक्रमाची काळजी घ्या. या कार्यक्रमातून जाणाऱ्या प्रत्येक मुलाने कार्यक्रम चांगला झाला असे म्हटले पाहिजे.

    आम्हाला मिशन आय ए एस ची पुस्तके छापायची होती .मी अण्णा साहेबां जवळ शब्द टाकला. अण्णासाहेबांनी मला बजेट विचारले .मी सांगितले. एक रुपयाही मागेपुढे न करता अण्णा साहेबांनी तेवढ्या रकमेची तरतूद करून दिली.
    पुढे आम्ही श्री संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर नाटक बसले. अण्णासाहेबांना ते आवडले. आमची मेहनतही आवडली. नाटक आमचे. गाड्या आण्णा साहेबाच्या. वराडी कवी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल वाघ हास्य सम्राट मिर्झा रफी अहमद बेग अमरावतीला आले की मी अण्णासाहेबांना फोन करायचा. अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर विठ्ठल वाघ मिर्झा शंकर बडे आलेले आहेत. अण्णासाहेब ताबडतोब त्यांच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करायचे .कवींना चांगले मानधन द्यायचे.

    मिशन आय.ए.एस.ची जडण घडण घडत असताना अण्णासाहेब आमच्या पाठीमागे देवदूतासारखे उभे राहिले. ते त्यांचे घर म्हणजे आमचे मिशन आय.ए.एस.चे कार्यालयात झाले. आमची घर केव्हा लहान होती .अण्णा साहेबांचे घर मोठे होते आणि मनही मोठे होते.. येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत करणे हा त्यांच्या ठिकाणी रुजलेला संस्कार होता.. त्यामुळे आमच्याकडे कोणीही पाहुणे आले तर आम्ही आमच्या घरी न नेता अण्णासाहेबांकडे घेऊन जायचे. अण्णासाहेब त्यांचे पूर्ण आदरतिथ्य करायचे. शिवाय पाहुण्यांना कुठे जायचे असते तर आपली कार उपलब्ध करून द्यायचे.

    आज मिशन आय.ए.एस.ची चळवळ पूर्ण भारतभर पसरली आहे. महाराष्ट्रातही 24 जिल्ह्यात मिशनचे काम सुरू आहे.शेकडो स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या .पुस्तक प्रकाशित झाली. भेट देणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांची संख्या देखील 400 च्या घरात गेली.आज अण्णासाहेब नाहीत. पण त्यांनी मिशनचा जो अंकुर होता त्याला जे खतपाणी घातले ते सर्वात महत्त्वाचे आहे. सामाजिक चळवळीसाठी काही माणसे स्वतःला झोकून देतात. त्यापैकी अण्णासाहेब एक होते. महाराष्ट्रात जेव्हा आयएएस हा शब्दही फार कमी लोकांना माहीत होता किंवा मर्यादित लोकांना माहीत होता .तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचण्यासाठी आम्ही जी चळवळ उभारली .त्या चळवळीला अण्णासाहेबांनी भरभरून मदत केली आणि आज मिशनला चांगले दिवस आलेले आहेत .याचे बरेचसे श्रेय अण्णासाहेबांना जाते. अण्णासाहेबांना आमचा मानाचा मुजरा.

    प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
    संचालक
    मिशन आय.ए.एस.
    अमरावती
    9890967003

  • मृत व्यक्तीला दिला रहिवाशी दाखला! वाडी नगर परिषदचा धक्कादायक कारनामा उघड निधनानंतर तीन वर्षांनी जारी झाला दाखला – प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मृत व्यक्तीला दिला रहिवाशी दाखला! वाडी नगर परिषदचा धक्कादायक कारनामा उघड निधनानंतर तीन वर्षांनी जारी झाला दाखला – प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मृत व्यक्तीला दिला रहिवाशी दाखला! वाडी नगर परिषदचा धक्कादायक कारनामा उघड
    निधनानंतर तीन वर्षांनी जारी झाला दाखला – प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
    वाडी, नागपूर (विजय खवसे ) –
    वाडी नगर परिषदचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने राहिवाशी दाखला जारी करून नगर परिषद प्रशासनाने स्वतःच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

    पुंडलिक बाजीराव मलग्राम, आंबेडकर नगर रहिवासी, यांचे 21 जून 2021 रोजी निधन झाले होते. याची नोंद नगर परिषदेकडे अधिकृतपणे उपलब्ध आहे. मात्र आश्चर्य म्हणजे, 9 जुलै 2024 रोजी त्यांच्याच नावाने रहिवाशी दाखला काढण्यात आला.

    हा दाखला नेमका कोणाला दिला गेला? कोणी काढला? कोणत्या अधिकाऱ्याच्या सहीने दिला गेला? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत. यात आर्थिक उलाढालीचा संशयही व्यक्त केला जात आहे.

    गेल्या काही वर्षांत अनेक बोगस प्रकरणं वाडी नगर परिषद प्रशासनावर अशा प्रकारच्या आरोपांची ही पहिली वेळ नाही.2015 मध्ये एका खाजगी हॉस्पिटलने प्रशासक प्रशांत पाटील यांच्या बोगस सह्या करून परवानगी मिळवली होती. त्यानंतर जुम्मा प्यारेवाले यांच्या सहीचा ही दुरुपयोग करीत आणखी एका प्रकरणात बोगस अनुमतीपत्र जारी करण्यात आले. या सर्व प्रकरणांत आजवर कुठलीच ठोस कारवाई झाली नाही, ज्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि असे गैरप्रकार सर्रास सुरू राहिले.

    मुख्याधिकारी बदलले, पण कारभार तोच!
    दाखला दिला गेला तेव्हा वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय देशमुख होते. WH NEWS ने संपर्क साधल्यावर त्यांनी जबाबदारी थेट उपमुख्याधिकाऱ्यावर ढकलली. सध्याच्या मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांनी सांगितले की, वरून आदेश मिळाल्यास चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कारवाई केली जाईल

    तक्रारदार शरद इंगळे म्हणाले…
    शरद इंगळे यांनी या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून त्यांनी म्हटले की, “जर मृत व्यक्तीच्या नावाने दाखला मिळू शकतो, तर वाडी नगर परिषदेत अजून किती फसवणूक सुरू आहे हे शोधायला हवे.”दोषीवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी शरद इंगळे यांनी केली.

    “लाडकी बहीण” योजनेचाही गैरफायदा?
    अहवालानुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर हजारो राहिवाशी दाखले जारी करण्यात आले. त्यातील किती बोगस आहेत, हे आता नव्याने चौकशीतूनच समोर येऊ शकते.
    नगर परिषदेत चाललेल्या या बेजबाबदार कारभारावर आता ठोस कारवाई होणार का?
    की पुन्हा एकदा वाडी नगर परिषद “भगवान भरोसे” सोडण्यात येणार?असा प्रश्न तक्रार कर्त्यांनी प्रशासनास केला.

     

    चौकशी करणार! माझ्या कडे अजून पर्यंत तक्रार आली नाही. वरून आदेश आले तर नक्की या प्रकरणी चौकशी समिती बसवून चौकशी करू दोषीवर कार्यवाही करणार

    -ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी नप वाडी 

  • दारूच्या नशेत भरधाव कार चालवून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी,एकाचा मेडिकल मध्ये उपचार सुरु.

    दारूच्या नशेत भरधाव कार चालवून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी,एकाचा मेडिकल मध्ये उपचार सुरु.

    दारूच्या नशेत भरधाव कार चालवून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी,एकाचा मेडिकल मध्ये उपचार सुरु.
    नागपूर,-  पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी गावात 22जून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने दोन मोटारसायकलांना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी अविनाश निकोसे यांच्यावर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात (वॉर्ड क्र. ३३) उपचार सुरू आहेत.

    पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, हुंडाई आरा कार (क्रमांक MP 66 ZC 3097) चा चालक मार्तंड जगत सिंह (वय ३१, रा. सिंगाही, जि. सिंगरोली, म.प्र.) याने बेफिकीरपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून हा अपघात घडवला. सिंगोरी येथील तेजराम जीवाजी रांगणकर (वय ४५) हे आपल्या शाईन मोटारसायकलवर (MH 40 BM 2215) शेताजवळील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी दुसऱ्या मोटारसायकलवर (MH 40 CU 6220) अविनाश नानाजी निकोसे (रा. डोरली) हे केशव रामदास रंगारी आणि त्यांच्या पत्नी ललिता रंगारी यांना घेऊन सिंगोरीच्या दिशेने जात होते.भरधाव कारने प्रथम निकोसे यांच्या मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर कार पुढे जाऊन तेजराम रांगणकर यांच्या मोटारसायकलवर आदळली.

    या अपघातात केशव रामदास रंगारी (रा.बाबुलखेडा नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी ललिता रंगारी आणि अविनाश निकोसे गंभीर जखमी झाले. तेजराम रांगणकर यांनाही गंभीर दुखापत झाली.गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. तेजराम यांना खासगी रुग्णालयात, तर इतर दोघांना पारशिवनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालक मार्तंड सिंह याच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत असल्याने तो नशेत असल्याचा संशय आहे.या प्रकरणी श्रीकृष्ण माणिक रांगणकर यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालक मार्तंड सिंह याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.कार मालक रजनी सिंह असल्याचे समजले.

  • आदिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके  -जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा घेतला आढावा

    आदिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके -जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा घेतला आढावा

    आदिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके

    -जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा घेतला आढावा

    नागपूर, दि. 27 : आदिवासी विकास विभागाकडून विविध विभागांना आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, संबंधित विभागाने हा निधी खर्च करताना त्याचा प्राधान्यक्रम व अधिकाधिक व्यक्तीविकास यांचा प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज केले.

    सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध योजनांचा आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

    वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय मेश्राम, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त (महसूल) राजेश खवले, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार, माजी महापौर माया इनवाते आदी यावेळी उपस्थित होते.

    आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी १६ विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यात सर्वाधिक ४२ टक्के निधी हा जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जातो.जिल्हा परिषदेमार्फत होत असलेल्या कामांबाबत सुलभता व गुणवत्ता जपण्यासाठी जिल्हा परिषदेत सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती येत्या काळात करण्याचे सूतोवाच आदिवासी विकास मंत्री श्री. उईके यांनी यावेळी केले.

    जिल्ह्यात एकूण ५८ गावे ही प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान अंतर्गत केंद्र शासनाने निवडली आहेत. यात भिवापूर तालुक्यातील ४, हिंगणा तालुक्यातील ५, कामठी १, काटोल २, मौदा १, नागपूर १, नरखेड १, पारशिवनी २, रामटेक ३४, सावनेर ६ आणि उमरेड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
    नागपूर महानगरपालिकेतील आदिवासी विभागाच्या विविध व योजना व उपक्रमांचा आढावा श्री.ऊईके यांनी यावेळी घेतला. एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत शहरी भागातील (महानगरपालिका) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. महानगरपालिकेसाठी २ हजार लाभार्थ्यांचे मंजूर उद्दिष्ट असून येत्या आठवडाभरात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

    आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक सोयी-सुविधा अधिक भक्कमपणे निर्माण करण्यात येईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  • सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन  -उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन -उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन

    -उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

    नागपूर, दि. २७ : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

    सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर न्या. भूषण गवई यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल,विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षल विरोधी अभियान),विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधी क्षेत्र आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा २९ जून २०२५ पर्यंत नागपुरात मुक्काम असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.