आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता वंचित, मागास, भटक्या, विमुक्त वर्गाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देवून त्यांच्या प्रश्र्नांची उकल करावी – प्रमोद काळबांडे
नागपूर – एक ऑगस्ट 2025 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती प्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थी कलावंतांच्या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना सकाळ वृत्तपत्र संपादक माननीय प्रमोदजी काळबांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना असे संबोधले की आता वंचित, गावकुसाबाहेर राहणारे भटक्या, विमुक्त समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
पुढे बोलले अतिशय कष्टातून पुढे येत शिक्षणाला प्रमाण मानून आम्ही इथपर्यंत यश संपादन करू शकलो. हे सर्व करीत असताना यामागे प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. महामानवांची होती.
मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित असलेले विद्यार्थी पालक व कलावंतांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रज्ञा बागडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आयकर विभाग नागपूरचे ॲडिशनल कमिशनर माननीय अरविंदजी रामटेके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देऊन म्हटले की विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीत लढून यश संपादन करणे काळाची गरज आहे. रडत बसू नका लढत रहा… असा संदेश याप्रसंगी देण्यात आला.
सुरेश कांबळे उपायुक्त आयकर विभाग,
सी.एस चव्हाण योगिता काकडे (व्यवस्थापक, म.फु.मा.वि. महामंडळ नागपूर) मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, भारतीय संविधानाची प्रत, स्मृतीचिन्ह व वृक्ष गमला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन कार्यकर्ता बाळू घरडे व सहकाऱ्यांनी अतिशय देखणा कार्यक्रमाचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली.
कार्यक्रमाचे संचालन पुष्पा घोडके आभार प्रदर्शन विनिता नंदेश्वर यांनी केले.
मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते गणमान्य नागरिक याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह आवळे बाबू चौक लष्करीबाग येथे उपस्थित होते.
65 विद्यार्थी व कलावंताच्या याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्रामुख्याने उपस्थिती चित्तरंजन चौरे, दीपक वासे ,मुरलीधर मेश्राम, आनंद चौरे, गोपीचंद पाटील, राहुल मेश्राम, धर्मपाल गजबे, शुभम घरडे, शतम घरडे ज्योती मानवटकर,पींकी इंदूरकर उल्का गरबे इ. उपस्थित होते.
Leave a Reply