काकांचे अमानवी कृत्य – वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी पुतणीला घराबाहेर फेकले, शिवीगाळ-धमकीप्रकरण midc पोलीस ठाण्यात
नागपूर | WH NEWS
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आधार बनण्याऐवजी पुतणीला घराबाहेर काढण्याचा अमानवी प्रयत्न काकांकडून झाल्याची धक्कादायक घटना एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत रमाबाई नगर जयताळा परिसरात समोर आली आहे. आरोपी काका मोरेश्वर नितनवरे आहे त्यांच्यावर bns कलम 115(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी काका मोरेश्वर नितनवरे व रामेश्वर नितनवरे यांनी पुतणी व तिच्या भावंडांना धमकावून, घरातील सामान बाहेर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील कारवाईसाठी न्यायालयाचा मार्ग दाखविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जदार ही प्रगती नितनवरे यांची बहिण असून ती सध्या नागपूर येथील एम.आय.डी.सी परिसरात आपल्या भावासह वडिलोपार्जित घरात राहत आहे. सदर जागेचे हिस्सेवाटप अद्याप झाले नसल्याने न्यायालयात वाद सुरू आहे. या घराची खरेदी अर्जदार हिच्या वडिलांनी केली होती. त्या अनुषंगाने तिला हक्काचा वाटा मिळावा यासाठी तिने न्यायालयात दावा दाखल केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रगती नितनवरे ही बहिणीस भेटण्यासाठी घरी आली असता, काका रामेश्वर नितनवरे यांनी अचानक घरी येऊन ‘हे माझ्या वडिलांचे घर आहे, तुला इथे राहायचं नाही’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे शिवीगाळ व धक्काबुक्की करत घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले. यावेळी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही समज न घेता पुन्हा अपमानजनक वर्तन केले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरी माने यांनी सदर प्रकार हा चडखलपात्र असून अर्जदारास कलम 115(2), 352 BNS नुसार कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय, काका मोरेश्वर नितनवरे यांनी घरातील वस्तू अक्षरशः बाहेर फेकून दिल्या व दुसऱ्या काकाने – रामेश्वर नितनवरे – पुतणीच्या भावाला घरी येऊन धमकी दिली की “आम्ही तुला इथे राहू देणार नाही,
विशेष म्हणजे, हे दोन्ही काका त्यांच्या वडिलांच्या (म्हणजे पुतणीच्या आजोबांच्या) दुसऱ्या घराबाबतही त्याच पद्धतीने पुतणीच्या भावंडांना फसवून, विश्वासात न घेता नावावर करून घेऊन आता त्यावरही हक्क हिरावून घेत आहेत.
पुतणी प्रगती थूल, मीनाक्षी बोरकर, व भाऊ अमृत ज्ञानेश्वर नितनवरे यांचा दावा आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर काकांनी मदत करायची सोडून उलट त्रास देण्यास सुरुवात केली. आधी दोन्ही काकांमध्ये वाद होता, मात्र आता एकत्र येऊन पुतणीच्या कुटुंबास त्रास देत आहेत.
या प्रकरणी MIDC पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीही एकमेकांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र आता पुतणीला प्रत्यक्ष धमकी देणे, मारहाण करणे, घराबाहेर काढणे यामुळे प्रकरण गंभीर बनले आहे.