दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद ◾️ चोरीच्या 11 दुचाक्या जप्त ◾️ स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

◾️ चोरीच्या 11 दुचाक्या जप्त

◾️ स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई

गोंदिया : दुचाकी चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहे. यश रमेश गुप्ता (वय 20 रा. मामा चौक, गोंदिया), लोकेश मानिकचंद रिनाईत (वय 21 रा. खापर्डे कॉलोनी, गोंदिया), राहुल उर्फ चंगा सुपचंद लिल्हारे (वय 23 रा. अंगुर बगिचा, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया चे पोलीस पथक हे गोंदिया जिल्ह्यातून विविध पोलीस ठाण्यात दाखल दुकाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा व चोरीच्या दुचाकींचा शोध घेत असताना. मामा चौक परिसरातील यश गुप्ता नावाच्या व्यक्तीकडे चोरीच्या दुचाक्या असून विक्री करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरी करून विक्री करणारा आरोपी यश गुप्ता यास त्याचेकडे असलेल्या चोरीच्या दुचाकींसह ताब्यात घेत सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने लोकेश रिनाईत व राहुल उर्फ चंगा लिल्हारे या दोघांनी दुचाक्या चोरी करून विक्री करीता आणून दिल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले. तिघांनाही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी संबंधात सखोल विचारपूस चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून दुचाक्या चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपीतांचे ताब्यातून गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर येथील दाखल गुन्ह्यातील तसेच जिल्हा भंडारा व नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या 8 लाख 35 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी व गुन्ह्यात जप्त चोरीच्या 11 दुचाक्या मुद्देमाल रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई रामनगर पोलीस करीत आहेत.

◾️यांनी केली कारवाई….

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या निर्देश आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, चालक पोलीस शिपाई खंदारे, मुरली पांडे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts