डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक रविभवनात पार पडली.
-जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती; डिजिटल पत्रकारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.- नागपुरात डिजिटल मीडियाचे भव्य कार्यालय स्थापन.. लवकरच होईल उदघाटन
नागपूर, दि. ११ ऑक्टोबर २०२५ (विजय खवसे)
डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाची महत्वपूर्ण बैठक शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रविभवन मिटिंग हॉल, नागपूर येथे पार पडली. या बैठकीस जिल्हा माहिती अधिकारी श्री. विनोद रापतवार यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व पत्रकार व संपादकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान श्री. रापतवार यांचा संघातर्फे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष भीमराव लोणारे व नूतन अध्यक्ष संतोष गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक महासचिव विजय खवसे यांनी केले, तर आभार कोषाध्यक्ष अमित वानखडे यांनी मानले.
संघाचे सहसचिव आमजेद शेख,व सदस्य
शैलेश गडपायले, नावेद आझमी, राजेश पांडे, हसीफ शेख, अमित वांद्रे, शीतल नंदनवार, प्रदीप कुमार, नेहाल पाटील, रियाज शेख तसेच नागपूर व परिसरातील मोठ्या संख्येने डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक व पत्रकार उपस्थित होते.
बैठकीत डिजिटल मीडिया क्षेत्रातील विविध मागण्या व सूचना जिल्हा माहिती अधिकारी श्री. रापतवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या.
डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता, सुविधा व संरक्षण देण्याची गरज असल्याचे सर्वांनी अधोरेखित केले.
डिजिटल मीडिया प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या :
• शासनमान्यता (Accreditation):
जिल्हास्तरावर कार्यरत डिजिटल न्यूज पोर्टल्स व त्यांच्या प्रतिनिधींना शासनमान्य पत्रकार म्हणून मान्यता द्यावी.
• ‘डिजिटल मीडिया भवन’ उभारणी:
पत्रकार परिषद, बैठक व संपादकीय कार्यासाठी स्वतंत्र “डिजिटल मीडिया भवन” जिल्हा मुख्यालयावर उभारण्यात यावे.
• वाहतूक सुविधा व प्रवास सवलत:
डिजिटल पत्रकारांना बस, रेल्वे व विमान प्रवासात शासनमान्य पत्रकारांप्रमाणे सवलतीचा लाभ द्यावा.
• शासन योजनांमध्ये समावेश:
मान्यता प्राप्त डिजिटल पत्रकारांना पत्रकार कल्याण निधी, विमा योजना, निवास योजना आदींचा लाभ मिळावा.
• पत्रकार संरक्षण कायद्यात समावेश:
महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यात डिजिटल पत्रकारांचा स्पष्ट समावेश करावा.
• प्रशिक्षण व कार्यशाळा:
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डिजिटल पत्रकारांसाठी तांत्रिक, नैतिक व सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित कराव्यात.
• प्रेस रिलीज वितरणात समावेश:
जिल्हा माहिती कार्यालयाकडून जारी होणाऱ्या सर्व सरकारी प्रेसनोट्स डिजिटल मीडिया प्रतिनिधींनाही नियमित पाठवाव्यात.
• जाहिरात वाटप धोरण:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात धोरणात डिजिटल मीडियाला स्वतंत्र व समप्रमाणात स्थान द्यावे.
बैठकीत उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमुखाने निर्णय घेतला की या सर्व मागण्या शासनाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्या.
डिजिटल माध्यम हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी व त्वरित माहिती देणारे माध्यम असल्याने शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा, अशी नम्र विनंती करण्यात आली.नागपुरात डिजिटल मीडियाचे भवन उभारण्यात आले. ज्यांना ज्यांना डिजिटल मीडियावर आपला आवाज या माध्यमातून पहचवीला जाईल, पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आली.
Leave a Reply