वाडी काँग्रेसमध्ये भूकंप! उमेदवारीवरून महास्फोट — अध्यक्षांसह 200 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे, भाजपाचा मार्ग मोकळा?
वाडी (WH NEWS प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर वाडी काँग्रेसमध्ये अक्षरशः स्फोटक राजकीय उलथापालथ घडली आहे.वाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश थोराणे यांच्यासह जवळपास 200 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देत पक्षात एकच खळबळ उडवली आहे. अचानक घडलेल्या या नाट्यमय निर्णयामुळे वाडीतील राजकीय वातावरण तापले आहे तर काँग्रेससमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
उमेदवारीवरून थोराणेंचा संताप – “आम्हाला वाढवायला सांगा आणि तिकीट बाहेरच्यांना द्या?”
मिळालेल्या माहितीनुसार, शहराध्यक्ष शैलेश थोराणे हे स्वतः उमेदवारीसाठी इच्छूक होते आणि (रविवार ता.16) पर्यंत त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना उमेदवारी देताच थोराणेसह कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड वाढला.
थोराणे यांनी स्पष्ट शब्दात टीका करत म्हटले कि
“पक्ष वाढवण्याचं काम आम्ही करायचं आणि तिकीट बाहेरच्या लोकांना द्यायचं? हे आम्हाला आता मान्य नाही!”
सुनील केदारांवर तिकीट वाटपात मनमानीचा आरोप!
वाडी व ग्रामीण भागातील पूर्ण तिकीट वाटपाची सूत्रे माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी मनमानी केली, स्थानिक नेतृत्वाला पूर्णपणे डावलले, अशा गंभीर आरोपांचा भडिमार बैठकीत करण्यात आला.
मंगळवारी माजी मंत्री सुनील केदार, रमेशचंद्र बंग, खासदार श्यामकुमार बर्वे, नानाभाऊ गावंडे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरी थोराणे गटाने कोणताही प्रतिसाद न दिल्याचे कळते.
तणाव शिगेला –
जिल्हाध्यक्ष,व प्रदेशाध्यक्षांकडे सामूहिक राजीनामे
थोराणे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस यांच्याकडे सुपूर्द केले.
गेल्या काही वर्षांत संघटनात्मक बळ वाढवलेल्या या टीमला अचानकपणे एक ‘झटका’ बसल्याने, कार्यकर्तेही हादरले आहेत.
काँग्रेसला मोठा धक्का – भाजपाचा मार्ग सुकर?
इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक राजीनाम्यांमुळे वाडी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत –
➡ काँग्रेसचे घरातील घरभेदी वाद भाजपाला थेट फायदा देऊ शकतात.
➡ काँग्रेस की “इतर” — भाजपासमोर कोण उतरेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष.
पत्रपरिषदेत उपस्थित होते —
शैलेश थोराणे, माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराणे, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे, प्रकाश कोकाटे, अनिल पाटील, माजी सरपंच भीमराव लोखंडे, प्रमिला पवार, बेबीताई ढबाले यांसह शेकडो कार्यकर्ते.
येथे उघडपणे आरोप झाले की
“स्थानिक निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना प्राधान्य, हे स्वीकारार्ह नाही!”
आता पुढे काय?
थोराणे गट कोणत्या नव्या राजकीय भूमिकेसह पुढे येतो?
काँग्रेस त्यांचे राजीनामे स्वीकारते की त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते?
निवडणुकीत सामना भाजप विरुद्ध काँग्रेस की भाजप विरुद्ध इतर?
वाडीच्या राजकारणात ‘पुढचे पाऊल’ आता सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.














