डॉ.नितीन तिवारी यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये प्रथमच “मित्रा क्लिप” प्रक्रियेद्वारे शस्त्रक्रिया केली

डॉ.नितीन तिवारी यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये प्रथमच “मित्रा क्लिप” प्रक्रियेद्वारे शस्त्रक्रिया केली
नागपूर – एक 57 वर्षीय व्यक्ती वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आले आणि डॉ. नितीन तिवारी, सीनियर इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट यांना भेटले, जे गेल्या 19 वर्षांपासून वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता (हृदयाची पंपिंग क्षमता 25% पेक्षा कमी होणे) आणि वॉल्व लीक (माइट्रल रेगुर्गिटेशन) झाली होती. त्यांच्या हृदयाचे ठोकेही बंद झाले होते आणि दोन्ही फुफ्फुसांमध्ये द्रव जमा झाला होता.

त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता आणि त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाईप्स लावण्यात आले होते, याशिवाय ते तीन महिन्यांहून अधिक काळ विविध हॉस्पिटलमध्ये भरती होते. डॉ. तिवारी यांनी त्याचे उपचार योग्य प्रकारे सुरू केले आणि त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी एआयसीडी (ऑटोमेटेड इम्प्लांटेबल कार्डियोवर्टर डिफिब्रिलेटर) लावले. त्यानंतर डॉ. तिवारी यांनी त्यांच्या लीक होणाऱ्या वॉल्वचा (माइट्रल रेगुर्गिटेशन) उपचार करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याच्या हृदयाला सूज आली होती. त्याच्या कमजोर शारीरिक स्थिती आणि कमी पंपिंग क्षमता लक्षात घेता, छाती उघडणे हा एक कठीण पर्याय होता.

म्हणूनच डॉ. नितीन तिवारी यांनी एक मिनिमली इनवेसिव ट्रांस-कॅथेटर माइट्रल वॉल्व रिपेअर करण्याचा विचार केला, ज्याला “मित्रा क्लिप” म्हटले जाते. या प्रक्रियेमध्ये छाती उघडण्याची आणि हृदय तात्पुरते थांबवण्याची आवश्यकता नसते. “मित्रा क्लिप” प्रक्रियेत, कॅथेटर (अंजीयोप्लास्टी प्रक्रियेप्रमाणे) मांडीमधून टाकले जाते आणि वॉल्व पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि वाल्व गळती थांबवण्यासाठी माइट्रल वॉल्ववर एक छोटी क्लिप लावली जाते, ज्यामुळे हृदयाला सामान्य रक्त प्रवाह पूर्ववत होतो.

ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि रुग्णाला नंतर डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. नितीन तिवारी यांनी सांगितले की, मध्य भारतात प्रथमच ‘मित्रा क्लिप’ प्रक्रियेने शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्ट फेल्युअर आणि लीक वॉल्व असलेल्या रुग्णांना विशेषतः झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो, थकवा, कोरडा कफ, पायांमध्ये सूज, भूक न लागणे आणि व्यायाम करण्यास असमर्थता दिसून येते. जर उपचार केले नाहीत, तर 57% लोक एक वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. डॉ. नितीन तिवारी यांनी डॉ. रवि बागली, डॉ. विनोद काशेटवार, श्री. अमित मुखर्जी, श्री. शांतनु, डॉ. पंकज जैन चौधरी, डॉ. अवंतीका जैस्वाल, श्री. राऊत, श्री. देवेंद्र, सिस्टर विद्या आणि सर्व कॅथ लॅब स्टाफ यांचे या प्रक्रियेच्या यशासाठी आभार मानले. डॉ. नितीन तिवारी म्हणाले की, ही “मित्र क्लिप” प्रक्रिया ही या क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts