नामांतर चळवळी तील योद्धा उपेंद्र शेंडे  निष्ठावंत सूर्यअखेर काळाच्या पडद्याआड… आज 4वाजता होणार अंतिम संस्कार 

नामांतर चळवळी तील योद्धा उपेंद्र शेंडे 
निष्ठावंत सूर्यअखेर काळाच्या पडद्याआड… आज 4वाजता होणार अंतिम संस्कार 

नागपूर – पंचशील नगर बुद्ध विहार चे पुर्व सरचिटणीस दौलतराव बारसे अमर चैत्य बारसे घाट सिद्धार्थ नगर चे माजी सरचिटणीस रिपब्लिकन पक्षाचे नेते नामांतर वीर तसेच माजी आमदार उपेंद्र जी शेंडे साहेब यांचे आज पहाटे ,३.३० वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळी ला मोठा धक्का बसला.

महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून रिपब्लिकन पक्षाची चळवळ रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि श्वासापर्यंत निष्ठेने प्रामाणिक राहून समाज उत्थानासाठी काम करणारा निस्वार्थी त्यागी चळवळीतला झंजावात आज आपल्यातून निघून गेले. निष्ठावंत सूर्याने समाजाला प्रकाश देण्याचे कार्य थांबवून जगाचा निरोप घेतला.

निस्वार्थ, त्यागी नामांतर वीर माजी आमदार उपेंद्र शिंदे साहेब यांच्या दुःखद निधनाने रिपब्लिकन पक्षाची आणि आंबेडकर चवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रिपब्लिकन पक्ष ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष तथा नामांतरवीर मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांचे मेडिकल कॉलेज, नागपूर येथे शनिवार दि २८-१२-२०२४ रोजी पहाटे ३-३० वा दु:खद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि २८-१२-२०२४ रोजी सायंकाळी ४-०० वा त्यांच्या राहत्या घरापासून महेंद्र नगर,पाण्याच्या टाकी जवळ, नागयेथून निघणार असून वैशाली घाट येथे अंतिम संस्कार होईल.

बुधवासी उपेंद्र शेंडे साहेब यांना WH न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts