स्नेहमिलन सोहळ्यातून २४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट ◼️जोश उत्साहासह मैत्रीबंध मेळावा ठरला भावनिक

Follow Us on :

स्नेहमिलन सोहळ्यातून २४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट

◼️जोश उत्साहासह मैत्रीबंध मेळावा ठरला भावनिक

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील डॉक्टर राधाकृष्णन विद्यालयातील २००१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा जवळील इटियाडोह धरण गोठणगाव येथे ता.२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल २४ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी दिसताच एकमेकांशी गळाभेट घेत आस्थेने विचारपूस केली स्वतःसह आपल्या बायको मुलांचा परिचय करून देत संवाद साधला, एकमेकांशी मनसोक्त गप्पागोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गेल्या दीड वर्षापासून सातत्याने आपल्या वर्ग मित्रांची भेट व्हावी जुने दिवस जुने बालपण पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर दिसावं यासाठी १४ डिसेंबर २०२३ रोजी व्हाट्सअप ग्रुप तयार करून संजय वलथरे गणेश धामट गौतम शहारे गंगोत्री जांभूळकर या वर्ग मित्रांनी विखुरलेल्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पाच दहा जवळील मित्र जोडले हळूहळू मित्रांची संख्या वाढत गेली आणि आज तारखेत तब्बल ६३ वर्गमित्र व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. बेत ठरला भेटायचं दीड वर्षापासून सुरू असलेल्या नियोजनाला तारीख मिळाली २५ डिसेंबर स्थळ ठरल ईटियाडोह धरण गोठणगाव येथे एकत्र जमण्याचा संकल्प केला, दिवस उजाडला ठरल्या प्रमाणे हळूहळू सकाळपासूनच एकेक जण जमायला सुरुवात झाली आणि तोच एक एक मित्र एकमेकांना दिसू लागला चेहरा समोर येतात जुन्या आठवणी समोर यायला लागल्या हळूहळू २५ ते ३० वर्गमित्र जमले आणि नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होण्याआधी गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा या गुरु पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी इतिहासाचे शिक्षक वलथरे सर तर इंग्रजीचे शिक्षक निमकर सर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली मान्यवर गुरुजनांचा येथोचित मानसन्मान केला त्यांनीही या बॅचमधील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्या वाणीतून आठवण करून दिली.व पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या.

उपस्थित झालेल्या सर्व वर्गमित्रांनी आपाल्या भावना व्यक्त केल्या वर्गात घडलेला प्रसंग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय गुरुजनांना व सहकारी मित्र मैत्रिणींना करुन दिला. हा मैत्रीबंध संमेलन जितका उत्साही व जोश पूर्ण होता तेवढाच भावनिक ठरला पुढील वर्षी परत नव्या दमान भेटण्याचा संकल्प करीत एकमेकांचा निरोप घेतला हा स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.

“ २४ वर्षाआधी कुणाच्या पायात चप्पल तर कुणी अनवाणी, हाफ पॅन्ट आणि शॉर्टसर्ट घालून कुणी पायी तर कुणी सायकलने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकत्र वेळ घालवणारे सर्व वर्गमित्र आज मोठ्या सुटा बुटात थाटामाटतात फरक एकच त्यावेळी ओठावर मिशी नव्हती गाल साफ होते पण आता मात्र दाढी वाढलेली टक्कल पडलेलं अचानक इतक्या वर्षानंतर थेट भेट झाल्याने अनेकांना आपल्या वर्गातील गोड – गोड आठवणी यायला लागल्या सगळ्यांना गप्पागोष्टी शिक्षकांच्या उखाड्या पाखाड्या आठवल्या अशातच बहुतेक वर्गमित्र मिळाले पणं काही काम असल्यामुळे येऊ शकले नाही. मात्र, काही या जगातच राहीले नसल्याने येऊ शकले नाही अशा वर्गमित्र व शिक्षकांच्या आठवणीने काही क्षणाकरिता सगळ्यांच्या डोळ्यात दुःख दिसून आले त्या सर्वांना दोन मिनिटांचं मौन पाळून आपल्या मित्र व शिक्षकांना श्रद्धांजली वाहली.”

सर्वांनी एकमेकांची भेट घेत
नौकरी व्यवसाय कौटुंबिक सुख-दुःख प्रसंग कथन केले. संपूर्ण दिवस उत्साही वातावरणात गेलेल्या या वर्ग मित्रांनी पुन्हा पुढल्या रौप्यमहोत्सवी २५ व्या वर्षी यापेक्षाही अधिक जल्लोषात स्नेहमिलन करण्याचा संकल्प करून सर्वांचा निरोप घेतला.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए