वाडी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची नवीन कार्यकारिणी जाहीर
वाडी WH NEWS : शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाडी शहर शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुधीरभाऊ सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख उत्तमभाऊ कापसे, तालुकाप्रमुख रुपेशजी झाडे तसेच रविभाऊ जोदांगडे, संतोषजी केचे आणि हर्षलजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीनुसार भाऊराव भिवाजी रेवतकर यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर संघटकपदी संतोष केसरवानी व मुकेशजी शर्मा यांची निवड करण्यात आली.
उपशहर प्रमुखपदी लक्ष्मण राऊत, अनिल विधळे, मनोज नगरारे, विलास भोंगळे, सुबोध जांभूळकर आणि दर्शन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभाग प्रमुखपदी अजय देशमुख, प्रशांत मस्के, गिरीश राऊत आणि रामकुमार सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच वॉर्ड प्रमुखपदी महेश पिंगळे, हिवराज खंडाळे, हर्षल कोल्हे, निखिल गायकवाड, अजय मोहोतकर, नारायण बोरजे, शशिकांत खोब्रागडे, राजू भादाडे, कैलास नवले, राहुल चोपडे, राजू गवळी आणि कोमेश उचे बघले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यरत राहतील, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
