नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती सभा यशस्वी

नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती सभा यशस्वी

नागपूर, दि. 26 जून 2025 : नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत, 26 जून नशामुक्ती दिनानिमित्त बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बेसा रोड, हल्दीरामजवळील शुभारंभ हॉल, मनीषनगर येथे संध्याकाळी 6 वाजता एक भव्य जनजागृती सभा आयोजित करण्यात आली.

मुकेश काळे (सदस्य, शांतता कमिटी, नागपूर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजात वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत नंदनवार (प्रशासक, बेसा पिपळा नगरपंचायत),  भूषणकुमार उपाध्याय (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस), नरेंद्र हिवरे (सहाय्यक पोलीस आयुक्त), डॉ. मोसम फिरके (वरिष्ठ मानसोपचार तज्ञ), आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मुकुंद कवाडे उपस्थित होते.

याशिवाय पोलीस मुख्यालयातील बँड पथकानेही कार्यक्रमात सहभाग घेतला.प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित 650 ते 700 महिला आणि पुरुष नागरिकांना ड्रग्स, गांजा, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, समाजावर आणि कौटुंबिक जीवनावर होणारे विपरीत परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, कोणीही अवैधरित्या दारू, गांजा किंवा ड्रग्स विकत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप: संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री 8:45 वाजता शांततेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली आणि राष्ट्रगीत गायनाने सभेची सांगता झाली.नागपूर शहर पोलीस आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या घोषवाक्याला साजेसा हा कार्यक्रम समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यात यशस्वी ठरला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts