जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा

जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा
अमरावती, दि. 26 – अमरावती जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात अमरावती शहरातून आयएएस (IAS) झालेले तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार असून, या वेळी त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर तसेच यशस्वी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने आयोजित हा उपक्रम, प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे. इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts