बुद्धाच्या मार्गानेच देश सुरक्षित – गेडाम
-सुरेश भट सभागृहाने अनुभवली प्रचंड गर्दी
नागपूर : बाहेर धो धो पाऊस कोसळत असताना सुरेश भट सभागृहात मात्र गर्दीचा महापूर ओसंडत होता. हा अनुभव होत काल झालेल्या “दुसरे महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर ” या नाटय प्रयोगाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियएर्स (बानाई) या संस्थेद्वारा निर्मित, विमलसूर्य चिमणकर यांच्या पुस्तकावर आधारित
प्रभाकर दुपारे लिखीत आणि प्रमोद भुसारी दिग्दर्शित या नाटय प्रयोगात, दुसऱ्या महायुद्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचे मर्म संगताना आजच्या काळात विध्वंस, युद्ध नरसंहार थांबविण्यासाठी अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने दिलेल्या संदेशानेच जगाला जावे लागेल असे मांडलेले सूत्र लोकांना भावले. प्रभाकर दुपारे यांनी रेखाटलेले प्रभावी प्रसंग, मार्मीक संवाद व प्रमोद भुसारी यांचे कल्पक दिग्दर्शन यामुळे या नाटकाने हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम यांनी या नाटकाची निर्मीती केली. सहाय्यक दिग्दर्शक अशोक गवळी, प्रथमेश वलीवकर, मुकुंद वसुले, सारनाथ रामटेके, रविंद्र दुरूगकर, मोहन पांडे, अतुल भुसारी, अनिल पालकर, मिनाक्षी देशपांडे, विनोद तुमडे इत्यादी ५० कलावंतांनी भूमिका केल्या. वेषभूषा डॉ. सुचित्रा भुसारी यांची होती. नाट्य प्रयोग निःशुल्क होता. या नाटकाचे शेकडो प्रयोग करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
Leave a Reply