हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त “आय एम फिअरलेस’’ मोहिमेचे आयोजन – अडथळ्यांवर मात करत आरोग्याचा उत्सव साजरा – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतभरातील १८०० महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग

spot_img

वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त “आय एम फिअरलेस’’ मोहिमेचे आयोजन
– अडथळ्यांवर मात करत आरोग्याचा उत्सव साजरा
– आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतभरातील १८०० महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर, ८ मार्च
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ”आय एम फिअरलेस” मोहिमेचे आयोजन केले. मुंबई सेंट्रल, मीरा रोड, राजकोट आणि नागपूर येथील विविध शाखांमधील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. रहिवासी डॉक्टर, डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इतर विभागांचे सहकारी मिळून तब्बल १८०० महिला कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता वाढवणे, त्यांच्या प्रतिभेला वाव देणे आणि संस्थेमध्ये एकजूट व सहकार्याची भावना निर्माण करणे हा या मोहिमेमागील उद्देश होता.

कार्यक्रमात नामवंत वैद्यकीय तज्ञ तसेच स्त्रीरोग व प्रसूती तज्ञांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. महिलांच्या पुनरुत्पादनक्षम आरोग्याविषयी सामान्य समस्या, दैनंदिन स्व:आरोग्य मूल्यांकनाचे महत्त्व, तसेच लवकर निदानाद्वारे गंभीर आजार टाळण्याचे फायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानांनंतर डॉक्टरांसोबत संवाद व प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सहभागींसाठी हा अनुभव अधिक माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरला.

महिला दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केक कटिंग, मनोरंजक खेळ आणि एकत्रीकरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
महिला आरोग्यासाठी प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्सने ८ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पॅप स्मीयर टेस्ट, मॅमोग्राफी आणि डॉक्टर कन्सल्टेशनवर २५% सूट दिली.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका, जहाबिया खोऱाकीवाला यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘’वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आम्ही महिलांना निर्भयपणे जगण्यासाठी सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. ‘आय एम फिअरलेस’ ही मोहीम महिलांच्या त्यांच्या सामर्थ्याची आणि जिद्दीची आठवण करून देणारी मोहीम आहे. महिलांचे आरोग्य आणि कल्याण जपण्याच्या या प्रवासात त्यांना साथ दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा दिवस केवळ उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी नसून, महिलांच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आहे”,

असे त्या म्हणाल्या
वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपचे मानवसंसाधन विभाग प्रमुख, अमिय कुमार साहू यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले कि, वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील महिलांचा सन्मान करणे आणि त्यांच्या आरोग्य, विकास आणि सक्षमीकरणाबाबत असलेली आमची आमची वचनबद्धता अधोरेखित करणे हा आमचा या मोहिमेद्वारे उत्सव साजरा करण्याचा उद्देश होता. या उपक्रमांमुळे सर्वांना एकत्रित येण्याची संधी मिळते आणि संस्थेमध्ये महिलांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची जाणीव होते.”

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सेंटर हेड, रवी बागली यांनीही आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या. ते म्हणाले, ”या उत्सवामुळे आमच्या महिला कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य, समर्पण आणि प्रतिभेचा प्रत्यय आला. त्यांच्या संघभावनेने आणि उत्साहाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आम्ही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
“आय एम फिअरलेस” ही मोहीम वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या महिला सशक्तीकरण, निरोगी जीवनशैली आणि रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी असलेल्या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भाग ठरत आहे.