पूर्व विदर्भातील नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
नागपूर – युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शकांना खाली तसेच युवा सेना सचिव आमदार वरून जी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने व
युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल दादा काकडे यांच्या नेतृत्वात आज पूर्व विदर्भातील नागपूर लोकसभा तसेच रामटेक लोकसभा युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी युवा सेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत *नीट,जेईई,लॉ सीईटी मॉक टेस्ट* उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात जास्तीत जास्त विद्यार्थी या मॉक टेस्टचा फायदा कसा घेऊ शकतील या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिवसेना पक्षातून ज्यांनी काही दिवसाआधी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता असे पंकज अहिरराव व त्यांचे प्रवीण अहिरराव (भारतीय जनता युवा मोर्चा शहर मंत्री) यांनी परत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल जिल्हा असलेला भगवा दुपट्टा घालून हर्षल दादा काकडे यांच्या शुभ हस्ते शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना सहसचिव जयसिंग राजे भोसले युवा सेना विभागीय सचिव युवती सेना अपूर्वा पीठ्ठलवार युवासेना वर्धा जिल्हा विस्तारक विक्रम राठोड युवासेना चंद्रपूर जिल्हा विस्तारक संदीप रियाल (पटेल) युवा सेना गडचिरोली जिल्हा विस्तारक शुभम सोरते
युवा सेना भंडारा जिल्हा विस्तारक अक्षय मेश्राम , युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक आशिष मनपिया,युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रीतम कापसे, लोकेश बावनकर, आकाश इंगोले, भंडारा जिल्हा युवा अधिकारी श्रीकांत मेश्राम , , युवा सेना वर्धा जिल्हा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, नागपूर शहर प्रमुख आशिष हाडके, जिल्हा समन्वयक अब्बास अली,गुलशन ग्वालानी, उपजिल्हा प्रमुख अखिल पोहनकर कौशिक येरणे,छोटू राऊत, उपजिल्हा प्रमुख प्रफुल कापसे, लखन राऊत, बंटी पंडेल, अविनाश लोखंडे
तसेच नागपूर लोकसभा रामटेक लोकसभा भंडारा लोकसभा वर्धा चंद्रपूर गडचिरोली येथील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply