स्त्रीवादाचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक -सुजाता लोखंडे

स्त्रीवादाचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक
-सुजाता लोखंडे

नागपूर : स्त्रीवादाचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ लेखिका सुजाता लोखंडे यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला विंगने आयोजित केलेल्या महिला परिषदेच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. एक दिवसीय परिषद महिला विभागाच्या अलका चौकीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केली होती.

व्यासपीठावर संस्थेच्या विदर्भ उपाध्यक्ष रमा वासनिक, सचिव ज्योती खोब्रागडे, धार्मिक कार्यकर्त्या उषा बौद्ध, संजीवनी सखी मंचच्या अध्यक्ष कल्पना मेश्राम सुजाता लोखंडे म्हणाल्या, तथागतांनी अर्हत पद पुरुषाबरोबरच स्त्री देखील प्राप्त करू शकते, यावर चर्चा केली आहे. बुद्ध खरे समानतेचे प्रेरक आहेत. धम्म चळवळ खरी मानव मुक्तीची चळवळ आहे. म्हणूनच. स्त्रीवादाचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. समता सैनिक दलाच्या बौद्धिक प्रमुख रंजना वासे म्हणाल्या, चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संघटना आवश्यक असते. त्यात काम करणाऱ्याला प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न विचारणे चांगली गोष्ट आहे. उषा बौद्ध, कल्पना मेश्राम, रमा वासनिक यांचीही समयोचित भाषणे झाली.

परिषदेचे उदघाट्न महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांच्या हस्ते झाले. हा महिलांचा महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम असून त्यांना व्यक्त होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. भारत बौद्धमय करण्याची ताकद त्यांच्यात आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. उदघाट्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या तक्षशिला वाघधरे होत्या. व्यासपीठावर भिक्खूणी सुनीती, राष्ट्रीय सरचिटणीस शंकर ढेंगरे, विदर्भ अध्यक्ष अनिलकुमार मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक अलका चौकीकर यांनी केले. संचालन भारती सहारे आणि मनीषा जामगडे यांनी केले तर मृणालिनी दहिवडे आणि वर्षा सहारे यांनी आभार मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी अस्मिता देशभ्रतार, भारती पानतावणे, तारा मेश्राम, अनिता बागडे, कल्पना गेडाम, नंदा रामटेके, नलिनी मेश्राम, जयश्री बोरकर, उषा मेश्राम, कल्पना बनकर, माया मोहाडे, वैशाली गडपायले, कल्पना तेलंग, तृप्ती ढोके, शोभा ढोणे आदींचे सहकार्य लाभले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts