संघरत्न मानके भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध  धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके -भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

संघरत्न मानके भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध  धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके –भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

नागपूर – हरदास नगर लष्करीबाग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले माजी नगरसेवक उत्तुंग शिखराचे धनी बहुआयामी सतधम्मीक व्यक्तिमत्त्व सचिदानंद मानके गुरुजी व मातोश्री सीताबाई मानके यांच्या परिवारात दिनांक ३ जानेवारी १९६२ साली जन्माला आलेले संघरत्न यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून १९६९ला बालवयात श्रमण जीवनात पाऊल टाकले जापानचे सोमेन होरीसावा यांच्या मार्गदर्शनात जापान ला जाऊन बौद्ध धम्म विषयक शिक्षण घेतले जापान येथेच राहून धम्म प्रचार करत असतांना भारतात येऊन धम्म प्रचार प्रसार करत महासमाधीभुमी पवनी व प्रज्ञागिरी डोंगरगड येथे आपले कार्य सुरू केले अनाथ नीराश्रीत दुर्बल विद्यार्थी यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जीवनावश्यक व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असंख्य विद्यार्थी घडवत त्यांना उच्चशिक्षित केले गावकुसातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले उत्तम दर्जेदार शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक प्रगती केली.

वाचनालय लायब्ररी मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते देशातील कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आली किंवा भुकंप दुष्काळ महामारी उत्पन्न झाली असता मदतीचा हात पुढे करून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे ही जाणीव बाळगून सतत प्रयत्न करत असतात.

भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या या धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके याच्या मार्गदर्शनातुन प्रेरक दिशादर्शक संदेश समोर येतो बौद्ध आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक चिंतक चिकित्सक व्याख्याते म्हणून नावलौकिक आहे वयाच्या त्रेसष्ठ वर्षाच्या प्रवासात पचपंन वर्ष धार्मिक जीवन जगत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांनी या पुढे सुद्धा धम्म प्रचार प्रसार क्षेत्रातील कार्य उत्तम प्रकारे चालू ठेवावे आणि जागतिक स्तरावर आपले योगदान द्यावे त्यांच्या आयु आरोग्य सुख समृद्धी साठी सदैव सदिच्छा व मैत्री भावना व्यक्त करतो
भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts