लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपुरात उद्या

0
22

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपुरात उद्या
नागपूर | WH NEWS प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या वतीने विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान राणी झाशी चौक येथील विदर्भ गौरव हिंदी साहित्य भवन येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रमोदजी कुदळे भूषवणार असून विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्ष नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात पक्ष संघटन मजबुती, विदर्भातील राजकीय स्थिती, कार्यकर्त्यांची भूमिका, तसेच आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
मेळाव्यासाठी विदर्भ संपर्क प्रमुख मा. पंकज मनोहर, सचिव मा. प्रशांत नानावे, जनरल सेक्रेटरी मा. अशोक गायकवाड, तसेच युवक आघाडीचे नेतृत्व मा. राणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन नागपूर शहराध्यक्ष मा. बबलूजी कडवे यांच्या वतीने करण्यात आले असून, विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here