लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) नागपूर शहर अध्यक्षपदी बबलुजी कडबे यांची निवड
नागपूर (WH NEWS )– लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) अंतर्गत नागपूर शहर अध्यक्षपदी मा. बबलुजी कडबे यांची निवड करण्यात आली आहे.
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चिरागजी पासवान, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढवण्यासाठी दलीत चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बबलुजी कडबे यांना हा प्रतिष्ठित पदभार सोपवण्यात आला आहे.

मा. कडबे गेल्या २० वर्षांपासून दलीत सेना आणि रामविलास पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग, अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेऊन समाजाला न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून ते परिचित आहेत.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदजी कुदळे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले की, बबलुजी कडबे यांचा नागपूर शहर अध्यक्ष म्हणून कार्यभार पार पाडताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील.

या निवडीवर अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. यामध्ये मा. पंकजनी मनोहरे (विदर्भ संपर्क प्रमुख), तुषार मोहोड (विदर्भ राज्य सरचिटणीस), नागेश मून, कवी तन्हा नागपूरी, राजू गायकवाड, प्रशांत बन्सोड, दिपकजी बुग्गेवार,शैलेश देव, सुरेशजी गाणार, रोशन बारमासे यांचा समावेश आहे.

Leave a Reply