फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी अटक
-हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला.
-महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी
WH NEWS क्राईम करस्पॉन्डंट, नागपूर –
नागपूर हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये मध्ये एका न्युज चॅनल च्या नावाने प्रवेश पत्र बनवून प्रवेश केल्याने
सदर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पत्रकार नरेंद्र वैरागडे याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.या बातमी ने नागपूर शहरासह जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सविता साखरे उर्फ कुलकर्णी आणि नरेंद्र वैरागडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींनी एका नामांकित संस्थेचे नाव वापरून बनावट ओळखपत्रे तयार केली होती. ही ओळखपत्रे वापरून त्यांनी हिवाळी अधिवेशनासह विविध नेत्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला होता.
सदर संस्थेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्यातील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शून्य गुन्हा नोंदवून हा तपास सदर पोलीस नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात नरेंद्र वैरागडे यांनी जामीन मिळवला आहे, तर सोमवारी सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सविता स्वतःला मोठी पत्रकार समजते, तिने आपले नाव हे कुलकर्णी ठेवले मात्र ती साखरे आहे. आता तिच्यावर नागपुरात टिळक पत्रकार भवन व प्रेस क्लब मध्ये होणाऱ्या पत्रकार परिषद मध्ये सुद्धा बंदी घातली आहे. हिवाळी अधिवेशन मध्ये दुसऱ्याच्या लेटर हेडचा उपयोग करून प्रवेश पत्र मिळविणे गंभीर गुन्हा असल्याने सदर पोलीस स्टेशन चे पीआई ठाकरे यांनी दाखल घेत कार्यवाही केली.पुढील तपास ठाणेदार मनीष ठाकरेयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.