वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर (WH NEWS क्राईम वाडी) – वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मारुती नगर, दत्तवाडी परिसरात दिनांक 23 ऑगस्ट 2025 शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार पकडला.प्रतिष्ठित १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, १,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोळ्याचा पाडव्यावर जुवा खेळण्याची परंपरा आहे.
काही नागरिक जुवा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच धाड घातली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार एका मोबाईल शॉपी जवळील डेरी परिसरातील बंद रूममध्ये आरोपी ताशपत्त्यांवर पैशाच्या हार-जीतचा जुगार खेळत होते. पोलीस उपनिरीक्षक भागवत कालींगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन छापा टाकला असता आरोपी रंगेहात जुगार खेळताना पकडले. सूत्रांने दिलेल्या माहिती अनुसार 17 नागरिक जुवा खेळत होते मात्र काही नोकरी करीत असल्याने त्यांच्यावर वाडी पोलिसांनी मेहरबानी दाखविली.
एक पोलीस अधिकारी ज्यांच्या घरी भाड्याने राहतो तो घर मालक ही जुवा खेळत सापडल्याने त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी मेहरबानी दाखविली असल्याचे बोलल्या जात आहे.जुवा तसा लाखों रुपयांचा खेळल्या जात होता मात्र नगदी हजारो मध्ये दाखविण्यात आला.१,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे पोलिसांकडून सांगितल्या गेले. पोलिसांनी मात्र आरोपीचे नावे का लपविले असा प्रश्न निर्माण होत आहे.
फिर्यादी पो.ना. सोमेश्वर मधुकर वर्धे (ब.नं.1036, पोलीस ठाणे वाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालामध्ये ताशपत्ते, रोकड रक्कम तसेच इतर साहित्याचा समावेश आहे.काही लोकांचे मोबाईल सुद्धा जप्त केले. जुवा खेळणाऱ्या लोकांना दारू पोहचविनाऱ्याचा सुद्धा मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे.
पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.मात्र सत्यताही लपविली जात असल्याची मोठी चर्चा आहे.या प्रकरणी डीसीपी रेड्डी यांनी लक्ष देऊन तपास केला तर सत्य उघड होईल.