बेलतरोडीतील कुख्यात गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कठोर कारवाई – बेलतरोडी पोलिसांचा धडाकेबाज निर्णय… कुख्यात रोहित तिवारी सेंट्रल जैल रवाना!
नागपूर (WH NEWS क्राईम प्रतिनिधी) –
नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात भीतीचे वातावरण निर्माण करणारा रोहित उर्फ पंडित संतोष तिवारी (वय 31, रा. राकेश लेआउट, सरफी आश्रमजवळ, बेलतरोडी) याच्यावर अखेर बेलतरोडी पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात डांबले आहे.
🔹 गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये होती दहशत
तिवारी याच्यावर बेलतरोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अवैध हत्यारे बाळगणे, जुगार खेळणे, नागरिकांना शिवीगाळ करून मारहाण करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
गेल्या काही वर्षांत त्याने परिसरात निर्माण केलेली दहशत इतकी वाढली होती की, नागरिकांना सुरक्षितपणे फिरणेही अवघड झाले होते.
🔹 प्रतिबंधक कारवायांनंतरही सुधारणा नाही
पोलीसांनी वारंवार त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने, त्याला रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली.
🔹 MPDA प्रस्तावाला तात्काळ मंजुरी
यामुळे बेलतरोडी पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायदा कलम ३अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या कार्यालयात सादर केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मा. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावास तात्काळ मंजुरी दिली. त्यानंतर आरोपीस थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
🔹 या अधिकाऱ्यांचे विशेष योगदान
या कारवाईत माननीय पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग, पोलीस उप आयुक्त परिक्षेत्र क्र. ४, सहा. पोलीस आयुक्त अजनी विभाग यांचे मोलाचे योगदान राहिले.
तर प्रत्यक्ष पातळीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडेयांच्या नेतृत्वाखाली सपोनि राम कांढुरे, श्रीकांत गोरडे, प्रियंका रामटेके, पोलीस हवालदार प्रशांत गजभिये, अंकुश चौधरी, श्याम सपकाळ, सुहास शिंगणे, गजभिये, भजन दास घरत व हेमंत उईंके यांनी ही कारवाई यशस्वी केली.
🔹 नागरिकांना मोठा दिलासा
या धडाकेबाज कारवाईमुळे बेलतरोडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गुन्हेगारांना रोखण्यासाठी नागपूर पोलिसांकडून वेळोवेळी होणाऱ्या अशा कडक कारवाया हीच खरी कायद्याची ताकदअसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Leave a Reply