“मोदी निवृत्त झाल्यास गडकरी पंतप्रधान व्हावेत” – काँग्रेस आमदाराची मागणी, मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदी निवृत्त झाल्यास गडकरी पंतप्रधान व्हावेत” – काँग्रेस आमदाराची मागणी, मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्लीआरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या वयानुसार निवृत्तीच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून मोठा राजकीय घणाघात करण्यात आला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्णा यांनी वक्तव्य करत म्हटले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षे पूर्ण करून पदावरून निवृत्त होत असतील, तर नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार ठरतील.

“गडकरींना गरिबांची जास्त काळजी”
बेलूर गोपालकृष्णा हे सागर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार असून त्यांनी म्हटले, गडकरींना देशातील गरीब जनतेची जास्त काळजी आहे. ते प्रामाणिकपणे काम करणारे नेते असून त्यांना विकासाचे भान आहे. त्यामुळे मोदी निवृत्त झाल्यास गडकरींचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

भागवतांचं सूचक विधान – भाजपला लागू करावं ’75 वर्ष’ फॉर्म्युला
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात म्हटले होते की, नेत्यांनी 75 वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त व्हावे. त्यानंतर काँग्रेसने सूचक इशारा देत म्हटले की, भागवतांचा हा संदेश पंतप्रधान मोदींसाठी आहे. कारण मोदी यावर्षी 75 वर्षांचे होत आहेत.

“येदियुरप्पा यांना हटवलं, मग मोदींनाही का नाही?”
पत्रकारांशी बोलताना आमदार गोपालकृष्णा म्हणाले की, भाजपने कर्नाटकमधील माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना 75 वर्षे पूर्ण होताच राजीनामा द्यायला लावला. तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. मग हाच फॉर्म्युला पंतप्रधान मोदींसाठी का लागू होत नाही? भाजपने भागवत यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

“देशात गरिबी वाढतेय, गडकरी योग्य पर्याय”
ते पुढे म्हणाले की, देशात गरीब अधिक गरीब होत चालले आहेत आणि अमीर अधिक अमीर. देशाची संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात जात आहे. या परिस्थितीत गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत. भाजपने याचा गांभीर्याने विचार करावा.ही मागणी पुढील राजकीय हालचालींना चालना देणारी ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.असे घडले तर महाराष्ट्राला पहिले प्रधानमंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्या माध्यमातून बहुमान मिळेल. व राज्यातील सर्वच पक्ष स्वागत करतील.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts