अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला मोठा विरोध!
-३० जून रोजी तिवसा येथे ‘५९ जातींचा’ भव्य एल्गार मोर्चा!
तिवसा WH NEWS : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आणि हक्काचे १३ टक्के आरक्षण वाचवण्यासाठी तिवसा तालुक्यात समाज बांधव आक्रमक झाले आहेत. अनुसूचित जातींतर्गत येणाऱ्या सर्व ५९ जातींना एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने येत्या ३० जून रोजी दुपारी १२ वाजता तिवसा येथे एका भव्य ‘एल्गार मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
२१ जून रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या अनुसूचित जातीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत या आंदोलनाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

या एल्गार मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तिवसा तालुक्यातील प्रत्येक गावात, तसेच विशेषतः बौद्ध विहारांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. रिक्षा अनाउन्समेंट, पॅम्पलेट्स आणि बॅनरच्या माध्यमातून या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. दरम्यान, मोर्चाच्या अंतिम पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या २८ जून रोजी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मोर्चा केवळ एका आंदोलनाचा भाग नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी, सरकारच्या जातीवादी धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि समान हक्क व न्याय मिळवण्यासाठी काढला जात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यातील सर्व ५९ जातींच्या नागरिकांनी ३० जून रोजी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. यावेळी अनिल थुल, प्रशांत कांबळे, सुदर्शन यावले, सागर भवते, संदीप चक्रनारायण, सचिन सोनटक्के, विनोद हगवणे, जगदीश दहीवाडे, सिद्धार्थ मुंद्रे, सारंग पाटील, गौतम वावरे, किशोर माहोरे, रवींद्र यावले, मिलिंद यावले, राजेंद्र बसवनाथे, महेंद्र कांबळे, अरविंद वानखडे, गुणवंत ठाकरे, संदीप दहाट, ममता घरडे, सविता खाकसे, वर्षा चक्रनारायण, लता सोनोने, कांता बेले, प्रफुल मकेश्वर, विलास मेश्राम, दिलीप जवंजाळ, सुभाष खाकसे, सुरेंद्र काळबांडे, पद्माकर खाकसे, चंदू हगवणे, पुरुषोत्तम मेश्राम, भारत दाहाट, विजय पाटील, नंदकुमार वानखडे, राजेंद्र शेंडे, जानराव मनोहर, आकाश मकेश्वर, मनोज वानखडे, सतीश यावले, विजय रंगारी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
————-
अनुसूचित जातीमधील या ५९ जातींना एकसंघ होण्याचे आवाहन
अंतर्गती, अनामुक, आरे माला, अरक्षण माला, बहना, बाहना, बाकड, बंत, बलाही, बलाई, बसोर, बुरुड, बंसोर, बंसोडी, बेडा जंगम, बुढगा जंगम, बेडर, भांबी, असादारू, असोदी, चामडिया, चामार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हरळी, खालपा, मोची, मोचीगार, मादार, मादिग, मोची, तेलगु मोची, कामाटी मोची, रानिंगार, रोहिदास, रोहित, सामगार, भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलगना, धेड, डोम, झडमल्ली, लालबेगी, बिंडला, ब्यागरा, चलवादी, चन्नैया, चेन्न दासर, होलया दासर, डक्कल, डोकलवार, धेड, हक्कय्या, कंकय्या, डोहोरा, डोम, डुमार, लल्लार, गंडा, गंडी, गरौडा, गॅरो, घाशी, घाशिया, हळीर, हलसार, हसलासर, हुलसार, हलस्वार, होलार, वलहार, होलया, होलेर, होलेया, होलिया, कैकाडी, कतिय्या, पथरिया, खंगार, कन्हेरा, म्राधा, खाटीक, चिकवा, चिकवी, कोलुपुलवांडलू, कोरी, लिंगाडेर, माडगी, मादिगा, महार, तरळ, मिनेमादिग, दख्खनी मांग, मांग म्हशी, मातंग मांग, गरूडी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मन्ने, मश्ती, मेघवाळ, मेंघवार, मिया अयलवार, मुकाहरी., नाडिया, हाडी, पासी, सांसी, शेनवा, चेनवा, सिंदवा, सांतिया, शिंदोळकर, शिताळकर, तिरगार, तिरबंदा, तुरी
————-
उपवर्गीकरण लागू झाल्यास असे नुकसान
सध्याच्या परिस्थितीत अनुसूचित जातीचे एकूण १३ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ५९ जातींना एकत्र १३ टक्के आरक्षणाचा फायदा घेता येतो आहे. मात्र उपवर्गीकरण लागू झाल्यास १३ टक्के आरक्षणात जातीच्या संख्येनुसार आरक्षणाची वाटणी केली जाण्याचा शक्यता आहे.
