बेलतरोडी पोलिसांच्या धाडसी कारवाईने महिलेचे प्राण वाचले दरवाजा तोडून आरोपीला पकडले; संभाव्य हत्या टळली

Follow Us on :

बेलतरोडी पोलिसांच्या धाडसी कारवाईने महिलेचे प्राण वाचले!
दरवाजा तोडून आरोपीला पकडले; संभाव्य हत्या टळली.
नागपूर WH NEWS : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागपूर शहर पोलीस अंतर्गत बेलतरोडी पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, धाडस आणि समन्वयामुळे एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे संभाव्य हत्या टळल्याची घटना गोटाळपांजरी परिसरात घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 मे 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12.05 वाजताच्या दरम्यान बेलतरोडी पोलिसांचे नाईट पेट्रोलिंग सुरू असताना गोटाळपांजरी परिसरात आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना थांबवून त्यांचा मुलगा हा पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करीत असल्याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण घोडके व पोलीस अंमलदार रितेश गोतमारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरात आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे (वय 22) हा पत्नी आश्लेषा ऋषिकेश वानखडे (वय 25) हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस अंमलदार रितेश गोतमारे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीच्या हातातील रक्ताने माखलेला चाकू हिसकावून आरोपीला जागीच ताब्यात घेतले.
जखमी महिलेला तात्काळ उपचार मिळावेत यासाठी स्वतंत्र पोलीस पथकाद्वारे एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळ ते हॉस्पिटल हे सुमारे 9.3 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार करण्यात आले. वेळेत उपचार सुरू झाल्याने महिलेचे प्राण वाचले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळ पंचनामा, वैज्ञानिक पुरावे संकलन, रक्त नमुने जप्ती आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2025 आणि 2026 या कालावधीत प्रभावी नाईट पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाया आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण समन्वयामुळे हत्या स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही यावेळी समोर आली.
या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए