नागपूर विधान परिषद निवडणूक : अखेरच्या दिवशी भाजपकडून डॉ. राजीव पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नागपूर WH NEWS – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर भाजपकडून डॉ. राजीव पोतदार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
नागपूर विधान परिषद जागेसाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये डॉ. राजीव पोतदार, दयाशंकर तिवारी आणि उपेंद्र कोठेकर यांची नावे प्रमुख मानली जात होती. अखेर पक्षश्रेष्ठींनी डॉ. राजीव पोतदार यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली.
मराठी
या निवडणुकीसाठी मतदान १८ जून रोजी होणार असून मतमोजणी २२ जूनला होणार आहे. नागपूरसह विदर्भातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप-नेतृत्वाखालील महायुतीने सर्वाधिक जागांवर दावा मजबूत केला असून विरोधकांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
कोणाला कुठे उमेदवारी?
महायुती आणि विविध पक्षांकडून विदर्भातील विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली आहे.वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद क्षेत्राचे उमेदवार अरुणजी लखाणी यांची वर्णी लागली इतर मतदारसंघांमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा आणि अर्ज प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
