महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची देणारा अर्थसंकल्प : ऍड. धर्मपाल मेश्राम

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची देणारा अर्थसंकल्प : ऍड. धर्मपाल मेश्राम

नागपूर – उद्योग, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरण, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल गतिमान करून राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची प्रदान करणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

राज्यात शंभर दिवसीय सात कलमी कृती आराखडा, महाराष्ट्रातील नवीन औद्योगिक धोरण 2025 व त्यानुसार राज्यात पाच वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगारांची निर्मिती, नवीन कामगार धोरण, गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गाच्या जाळ्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद, सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी 6400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, नागपूर येथे अर्बन हाट चा स्थापना अशा व अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न असल्याचेही मत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.

आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा गौरवशाली निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. हे दोन्ही निर्णय आणि त्यासाठी अर्थसंकल्पातील विशेष तरतूद सामाजिक न्यायाचा पाया अधिक भक्कम करणारा आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts