बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तांची परीक्षा केंद्राला दिली अचानक भेट !

 

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तांची परीक्षा केंद्राला दिली अचानक भेट !

नागपूर – सध्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. विद्यार्थ्यांना तणावरहित परीक्षा देण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी यापूर्वीच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे.

आज पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी हिस्लॉप कॉलेज या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी परीक्षा केंद्रात पुरविण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली तसेच परीक्षा सुरळीत पार पडत आहे की नाही, याचा आढावा घेतला. राज्यभरात सुरू असलेल्या “कॉपी मुक्त परीक्षा” अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी परीक्षा केंद्रावरच्या तयारीची पाहणी केली.

हिस्लॉप कॉलेज या केंद्रात 228 विद्यार्थी गणिताचा पेपर देत होते. संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांनी परीक्षा केंद्रप्रमुख आणि शिक्षकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शांत परीक्षेसाठी अनुकूल वातावरण असल्याबाबत त्यांनी खात्री केले.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे परीक्षा केंद्रात सतर्कता वाढली असून, परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत विश्वास अधिक दृढ झाला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts