माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन
मूर्तिजापूर – विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
माजी आमदार तुकाराम बिरकड हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानंच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे.
अजितदादा पवार,राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी