डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ठिकाणी रमाई यांची 127 वी जयंती साजरी -रमाईचे वंशजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ला सदिच्छा भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ठिकाणी रमाई यांची 127 वी जयंती साजरी

-रमाईचे वंशजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ला सदिच्छा भेट

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ९ फेब्रुवारी, रविवारी झालेल्या नुकत्याच जयंती समारोह प्रसंगी रमाईचे वंशज शुंभागीताई धोत्रे (वाघचौरे) रमाई मातेची भाची यांना खास म्हणून सन्मान देऊन बोलावून व विरेंद्र वाघचौरे (मुलगा) यासोबतच मयुर शिर्के, गौतम मोरे, वैभव मोरे, पुर्णिमा मोरे तसेच इतरही सदस्यांची या प्रसंगी उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मान -सन्मान देऊन सन्मानित केले.

रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या परिवारा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथे साखळी उपोषण आंदोलनाचा ९ फेब्रुवारी रोजी 131 वा, दिवस होता.

त्यावेळेस रमाई चे वंशज यांनी सदिच्छा भेट देऊन समर्थन दिले. यावेळी राजकुमार वंजारी, रेशम भोयर, अलका रक्षित, सुनिता सांगोळे, आशा दहाड, परि रंगारी, अन्नपूर्ण मेश्राम, यमुनाबाई रामटेके, विजया पाटील, जिजा रामटेके, वनिता वालदे, शाशिकला चालखुरे, संघमित्रा रागटेके, रेखा खोब्रागडे, जया पाटील, चंदा मेश्राम, गौतम पाटील, अजय खोब्रागडे, राजकुमार मेश्राम, आनंद वाघमारे, प्रफुल्ल खोब्रागडे, यांची उपस्थिती होती. संचालन गौतम पाटील यांनी केले. प्रास्तविक चंदु पाटिल यांनी केले तर आभार सुषमा कांबळे यांनी मानले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts