वाडीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

वाडीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
वाडी :महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेची ज्योत राज्यातील जनमानसात पेटवून शिवसेना संघटनेची स्थापना करून हिंदुत्वासाठी प्रखर लढा उभारणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची नव्यान्नववी जयंती 23 जानेवारी ला साजरी करण्यात आली.

वाडी शहर शिवसेना व युवासेना च्या वतीने वाडी येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनासह माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.वंद.बाळासाहेब ठाकरे यांनी कणखर धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा जीवन प्रवास शहर प्रमुख मधू माणके पाटिल यांनी आपल्या भाषणातून सांगितला. यावेळी विधानसभा संघटन प्रमुख संतोष केचे यांच्या हस्ते केक कापून मिठाईचे वितरण करण्यात आले.

यावेळी उप तालुकाप्रमुख रुपेश झाडे, जेष्ठ शिवसैनिक हरिशभाई हिरनवार, दिलीपभाऊ चौधरी,प्रमोद जाधव,चंदन दत्ता, उमेश महाजन, किशोर ढगे,विलास भोंगळे, भोजराज भोंगळे, सचिन बोंबले, क्रांती सिंग, लखन राऊत,कमल तायडे, सुबोध जांभुळकर, मनोज नगरारे , अभय वर्मा,शिवनारायण पवार,सुभाष माने,दशरथ वांगे,अमोल सोनसरे, बंडू चौधरी व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts