प्रभाकर दुपारे समग्र नाटक ला शब्दगंध पुरस्कार

प्रभाकर दुपारे समग्र नाटक ला शब्दगंध पुरस्कार

नागपूर,-प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे यांच्या नुकतेच प्रसिद्ध झालेल्या प्रभाकर दुपारे समग्र नाटक या पुस्तकाला अहमदनगरच्या शब्दगंध राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला. येत्या ९ फेब्रुवारी रोजी नगर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात येईल.

शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्ष माजी प्राचार्य पी पी. ढाकणे, सचिव सुनील गोसावी, राज्य संघटक डॉ. अशोक कानडेव नियोजन समितीचे प्रमुख बबनराव गिरी यांनी ही घोषणा केली. या पुस्तकात प्रभाकर दुपारे यांनच्या एकुण १० गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. शब्दगंधच्या वतीने या सोबतच तळ हातावर उगवलेल्या कविता (सुनील कोंडके, निवडुंगाची काटे जी.जी.कांबळे (साकव (अंगीता पुराणीक) तडजोड (निवृत्ती जोरी) जिव्हाळ्याची माणसं (भास्कर बंगाळे, (ऑल इज वेल (विनय मिरासे) मराठी तेलगु भाषिक अनुबंध (डॉ. आत्मराम राठोड, गंपुच्या गोष्टी, (गौरव भुकन) काव्य संकल्प (हनुमान माने) संकिर्ण संत तुकाराम एक चिंतन (डॉ. सभिाष बागल) यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृती चिन्ह, शाल, सन्मान चिन्ह व ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts