अन् मोबाइलने घेतला शिक्षकाचा जीव ◾️मोबाइलचा स्फोट झाल्याने घडली घटना : एक जखमी

अन् मोबाइलने घेतला शिक्षकाचा जीव

◾️मोबाइलचा स्फोट झाल्याने घडली घटना : एक जखमी

गोंदिया : ‘अन्न वस्त्र निवाराʼ प्रमाणे मोबाइल फोनही आज प्रत्येकाच्या गरजेचा झाला आहे. मात्र, उपयोगी असलेला मोबाइल मानवासाठी घातकही ठरत आहे. अशीच एक घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात शुक्रवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीवरून जात असलेल्या शिक्षकाच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले त्यांचे भाऊ जखमी झाले. सुरेश भिकाजी संग्रामे (रा. टोला सिरेगाव) असे मृत शिक्षकाचे तर नत्थू गायकवाड असे जखमी भावाचे नाव आहे.

शुक्रवारी सानगडी येथे आठवडी बाजार होते. त्यामुळे दोघेही बाजारासाठी गेले होते. दरम्यान, बाजार करून परत स्वगावी सिरेगाव टोलाकडे येत असताना सिरेगाव ते सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात सुरेश यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेला मोबाइलचा स्फोट झाला. त्यामुळे त्यांचे कपडे जळून छातीच्या काही भागही जळाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत दुचाकी वर मागे बसून असलेले त्याचे भाऊ नत्थू गायकवाड गाडीवरून पडल्याने, किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
००००००००००००

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts