फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

फुलेवाडाभिडेवाड्यातील स्मारकांच्या

कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

– उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 8 :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिकसामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री श्री. भुजबळमुख्य सचिव डॉ. नितीन करीरगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिकनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयअल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तरपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतिज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्यस्त्री शिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टाकेलेला त्याग याची माहिती शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शनप्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवन कार्याबद्दलची माहिती देणारे थिएटरयूपीएससीएमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्रकौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तू सौंदर्यात भर घालणारे असले पाहिजेत्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts