चित्रपट जगतात विनोद डवरे…बस नाम ही काफी है !

चित्रपट जगतात विनोद डवरे…बस नाम ही काफी है !

गेल्या चाळीस वर्षापासुन मराठी चित्रपट क्षेत्रात आयुष्य झोकुन देणारा माणूस तसे ते मुळ नागपूर जिल्ह्याचे पण सोनेरी स्वप्न घेऊन मायानगरी मुंबईला आपले नशिब आजमावयाला गेले.अनेक हाल अपेक्षा सहन करून शेवटी यशस्वी आकाशाला हात गवसलेच…. आणी ते घरोघरी पोहचले…. “दामिनी ” ही सिरीयर त्यांची अतीेशय लोकप्रिय झाली त्यातुन खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख संपूर्ण भारतात झाली.

आज सिनेमा क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलावंत त्यांच्या हातातून घडले. अतीशय मनमिळावु स्वभावाचा धनी असणारा हा माणूस आज ही जमिनीशी नाळ जुळून आहे.गेला आठ वर्षापासून सिनेमाच्या सेंन्सन बोर्डवर राहून अनेक चित्रपटाचे सेन्सर केले. माझ्या सारऱ्या अनेक लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांच्या जिवनात बदल घडनवण्याचे कार्य हा माणूस सतत करत असतो. अशा मासणाची भेट होणे ही माझ्यासाठी अतीशय आनंदाची बाब आहे. तसे ते नागपूरला आले.की मला आवर्जून भेट देत असतात गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मला लहान भाऊ म्हणून ते वेळोनवेळी मार्गदर्शन करत असतात.

क्रांतीभूमी असणारी आमची दिक्षाभूमी येथुनच परीवर्तनाची मशाल हाती घेऊन मी माझ्या कार्याची सुरूवात करत असतो.व विनोद डवरे दादा हे नेहमीच मला प्रोत्साहन देऊन सिनेमा जगायला लावत असतात. नागपूर शहरातला असा कोणताच कलावंत नाही की त्यांना विनोद डवरे हे नाव माहीत नाही आणी ज्या कलावतांना हे नाव माहीत नाही तो कलावंतच नाही असे माझे प्रामाणीक मत आहे….म्हणून बस नाम ही काफी है…विनोद डवरे…! – नागेश वाहुरवाघ ,नागपुर

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts