निधन वार्ता
पत्रकार ओमराज सरदार यांना मातृशोक…आशाबाई सरदार यांचे निधन!
नागपूर: झुलेलाल हाउसिंग सोसायटी, हरिहर नगर, बेसा नागपूर येथील रहिवासी आशाबाई श्रीराम सरदार (वय 79) यांचे आज गुरुवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2:45 वाजता दीर्घ आजाराने मिडास हॉस्पिटल, रामदासपेठ, नागपूर येथे निधन झाले.
महिन्याभरापूर्वीच त्यांच्या पती श्रीराम सरदार यांचेही निधन झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुद्धवासी आशाबाई ह्या आवाज इंडिया टीव्हीचे स्टार रिपोर्टर ओमराज सरदार यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुली, चार मुले तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता मानेवाडा घाटावर करण्यात येणार असल्याची माहिती ओमराज सरदार यांनी दिली.

Leave a Reply