नागलवाडीत वृक्षारोपण व पत्रकार सत्कार कार्यक्रम उत्साहात 

नागलवाडीत वृक्षारोपण व पत्रकार सत्कार कार्यक्रम उत्साहात 
नागपूर (दि. १९ सप्टेंबर २०२५) :
उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने नागलवाडी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या सरपंच सौ. हिराबाई साहारे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच नानाभाऊ लापकाळे व संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत उपस्थित होते.


या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार श्री. रमेशभाऊ पाटील (नवभारत व नवराष्ट्र) यांचा निष्पक्ष पत्रकारितेसाठी संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील सचोटीच्या पत्रकारितेचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
आभार प्रदर्शन उत्तम कीडस कॉन्हेटच्या प्राचार्या रजनी बगडे यांनी केले.

यावेळी उपसरपंच जितुभाऊ साहारे, महादेव मांदाळे, पुनम थोमर, मायाताई सोनुने, किरण कवाडे, रोशन खापेकर, प्रियंका वालदे, एल.आर. पटेल, रागिनी ताजने, माधुरी कोटरूंगे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पर्यावरण रक्षण व सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts