नागपूरमधील एचडीएफसी स्काय ग्राहकांपैकी सुमारे 70% उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत
नागपूर, – भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि गतिशील वित्तीय सेवा कंपनी, एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड (एचएसएल) ने त्यांच्या ग्राहक-केंद्रित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल माहिती दिली आणि आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या सहामाहीत आणि त्यानंतर भारताच्या आर्थिक विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला. 25 वर्षांहून अधिक अनुभवासह, एचडीएफसी सिक्युरिटीज उद्योगात आघाडीवर आहे आणि विश्वास, पारदर्शकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम करून लाखो ग्राहकांसाठी गुंतवणुकीचा अनुभव नव्याने सादर करत आहे, ज्यात पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे ग्राहक ते अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती यांचा समावेश आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर एग्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे प्रमुख, श्री. उन्मेष शर्मा यांनी गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि ब्रँडच्या व्यापक प्रवासाला बळकटी देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी बदलत्या बाजारपेठेबद्दल आणि त्याचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम याबाबत आपले विचार मांडले. तसेच, आजच्या माहितीपूर्ण आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम गुंतवणूकदारांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आर्थिक सेवांच्या उद्योगातील बदलांविषयीही मार्गदर्शन केले.
“महाराष्ट्रात एचडीएफसी स्काय साठी सर्वाधिक योगदान देणारे शहर म्हणून नागपूर उदयास आले आहे. येथे एकूण 11% नवीन ग्राहक जोडले गेले असून, नागपूरने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरलाही मागे टाकले आहे. शहरात महिलांचा सहभाग अधिक असून 52% ग्राहक महिला आहेत, तर 48% पुरुष आहेत. गुंतवणुकीसाठी इक्विटी हा प्रमुख पर्याय ठरत असून 97.5% ऑर्डर इक्विटीमध्येच झाल्या आहेत, तर एफ अँड ओ आणि एमटीएफ मिळून केवळ 2.5% आहेत. नागपूरमधील एचडीएफसी स्कायचे सुमारे 70% ग्राहक हे उद्योजक आणि स्वरोजगार करणारे आहेत. तसेच 18 ते 35 वयोगटातील तरुण गुंतवणूकदार एकूण ऑर्डरपैकी 51% आहेत. विशेष म्हणजे, यापैकी 60% ऑर्डर दरमहा 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांकडून आल्या आहेत. यावरून शहरातील कमी उत्पन्न गटातील लोकांमध्येही आर्थिक समावेशन आणि गुंतवणुकीची आवड वाढत असल्याचे दिसून येते.”
“इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील दहा रिटेल ट्रेडर्सपैकी नऊ जणांना तोटा होतो, आणि वार्षिक सरासरी तोटा 1.1 लाख रुपयांहून अधिक असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय हे सखोल विश्लेषण किंवा विश्वासार्ह संशोधनाशिवाय घेतले जातात. या आव्हानावर उपाय म्हणून एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या ऑल-इन-वन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म ‘एचडीएफसी स्काय’ साठी नवीन कॅम्पेन सुरू केले आहेत. या प्लॅटफॉर्ममध्ये तीन मुख्य फायदे अधोरेखित केले आहेत – 25 वर्षांहून अधिक मार्केट अनुभवावर आधारित मोफत रिसर्च केलेल्या स्टॉक शिफारसी, संपूर्ण पारदर्शकतेसह फक्त 20 रु. ब्रोकरेज किंवा कोणतेही लपलेले शुल्क नाही, आणि एकाच अॅपमध्ये इक्विटी, म्युच्युअल फंड, ईटीएफ, एफ अँड ओ, कमोडिटीज आणि करन्सीजमध्ये सहज गुंतवणूक करण्याची सुविधा.”
“एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ इंस्टिट्यूशनल इक्विटीज श्री. उन्मेष शर्मा म्हणाले, ‘एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये आमचे उद्दिष्ट केवळ बाजाराविषयी ठोस माहिती देणे नाही, तर गुंतवणूकदारांना योग्य ज्ञान, स्पष्टता आणि योग्य साधने उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे ते अधिक चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतील.
बाजारपेठ बदलत असताना गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची आणि त्यांना जोडण्याची पद्धत देखील बदलायला हवी.’ ही चर्चा एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे, गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे आणि स्टेकहोल्डर्ससाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे यावर भर दिला जातो.”
श्री. शर्मा पुढे म्हणाले,“ एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये आम्ही केवळ प्लॅटफॉर्म देत नाही, तर संधी देतो. भारत एका मोठ्या परिवर्तनकारी दशकाच्या उंबरठ्यावर आहे आणि आमचे ध्येय प्रत्येक भारतीयाच्या हातात गुंतवणुकीची माहिती पोहोचवणे आहे. एचडीएफसी स्काय, संशोधनावर आधारित माहिती आणि वैयक्तिकृत वेल्थ सोल्यूशन्सच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना केवळ गुंतवणूक करण्यास नव्हे, तर योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यास सक्षम करत आहोत.” सात दशलक्षांहून अधिक ग्राहक, 130 हून अधिक शाखा आणि 3,400 व्यावसायिकांच्या टीमसह एचडीएफसी सिक्युरिटीज भारताच्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनी मानवी दृष्टिकोन आणि डिजिटल नवकल्पना यांचा संगम करून गुंतवणूकदारांना सक्षम करत आहे आणि दीर्घकालीन आर्थिक समृद्धी सुनिश्चित करत आहे.
“गेल्या वर्षभरात एचडीएफसी सिक्युरिटीजने उल्लेखनीय डिजिटल परिवर्तन साध्य केले असून आपल्या सर्व ग्राहकांना यशस्वीरित्या पुढील पिढीच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘एचडीएफसी स्काय’ कडे यशस्वीरित्या स्थलांतरित केले आहे. या अॅपने आधीच 18.5 लाखांहून अधिक ग्राहक जोडले आहेत, 3,586 कोटींपेक्षा जास्त डिमॅट मालमत्ता आणि दरमहा सरासरी 4 लाख कोटींहून अधिक डेरिव्हेटिव्ह्ज टर्नओव्हर नोंदवला आहे. याशिवाय, 5.4 लाखांहून अधिक आयपीओ अर्जही प्रक्रियेत आणले गेले आहेत, ज्यामुळे एचडीएफसी स्काय भारतातील नव्या पिढीच्या गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे अॅप बनले आहे. प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर 4.5 स्टार रेटिंगसह, एचडीएफसी स्काय आपल्या श्रेणीत सर्वात जास्त रेटिंग असलेले अॅप बनले आहे, जे शून्य ब्रोकरेज सुविधा, अत्याधुनिक रिसर्च टूल्स आणि वन-क्लिक इन्व्हेस्टिंग सोल्यूशन्स देऊन ग्राहकांना सहज अनुभव देते. या परिवर्तनामुळे एचडीएफसी सिक्युरिटीज केवळ एक ब्रोकरेज कंपनी न राहता, गुंतवणूकदारांना त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करणारे हायपर-डिजिटल इकोसिस्टम म्हणून उभे राहिले आहे.”
“वेल्थ दैट गोज बियॉन्ड नंबर्स” या तत्त्वानुसार एचडीएफसी सिक्युरिटीजने मजबूत संपत्ती आणि सल्लागार सेवा तयार केली आहे, ज्यामध्ये प्रामाणिकतेवर आधारित सल्ला आणि कमिशन-फ्री शिफारसींवर भर देण्यात आला आहे. कंपनी अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती (यूएचएनआय), फॅमिली ऑफिसेस आणि कॉर्पोरेट ट्रेझरीसाठी वैयक्तिकृत वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स देते. त्यांच्या सेवांमध्ये इक्विटी, म्युच्युअल फंड्स, पीएमएस, एआयए, फिक्स्ड इन्कम, प्रायव्हेट मार्केट्स, रिअल इस्टेट आणि ग्लोबल इन्व्हेस्टिंगसह सर्व आर्थिक गरजांचा समावेश आहे. 25 वर्षांच्या रिसर्च अनुभवासह आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पना एकत्र करून एचडीएफसी सिक्युरिटीज हे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिकृत, संशोधन-आधारित आणि पारदर्शक मार्गदर्शन प्रदान करते.
“भारताच्या आर्थिक भविष्यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीज अत्यंत आशावादी आहे. एसअँडपी ग्लोबलच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचा जीडीपी 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि पुढील दशक परिवर्तनशील ठरेल. कंपनीनुसार या वाढीचे प्रमुख घटक म्हणजे घरगुती बचतींचे इक्विटीमध्ये रूपांतरण, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत डिजिटल प्रवेश, अनुकूल आर्थिक धोरणे, अनेक वर्षांतील सर्वात कमी महागाई, मजबूत जीएसटी संकलन आणि सरकारी खर्चातील वाढ आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज बँकिंग आणि वित्तीय सेवा, सिमेंट, रिअल इस्टेट, मेटल्स आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांबाबत सकारात्मक आहे. मात्र, आयटी, हेल्थकेअर, ग्राहक क्षेत्रे, इंडस्ट्रियल्स, केमिकल्स आणि ऑटोमोबाईल्स यावर तटस्थ दृष्टिकोन ठेवला आहे, तर मिश्रित परिस्थितीमुळे ऑईल आणि गॅस क्षेत्राबाबत सावध भूमिका घेतली आहे.”
“एचडीएफसी सिक्युरिटीजने H2FY26 आणि त्यानंतरच्या काळासाठी आपल्या स्टॉक शिफारसी जाहीर केल्या आहेत. या शिफारसींमध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या गुंतवणूकदारांसाठी पुढील संपत्ती निर्माण करण्याच्या संधी ठरू शकतात. लार्ज-कॅपमध्ये कंपनीने लार्सन अँड टुब्रो, युनायटेड स्पिरिट्स आणि अपोलो हॉस्पिटल्स यांची निवड केली आहे. मिड-कॅप संधींमध्ये आयपीसीए लॅब्स, एमसीएक्स, इंडियन बँक आणि पीबी फिनटेक यांचा समावेश आहे, तर स्मॉल-कॅप संधींसाठी शोभा, अंबर आणि नवीन फ्लोरिन यांची शिफारस करण्यात आली आहे.”
एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड बद्दल
एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड ही भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी असून ती देशभरातील लाखो ग्राहकांना सेवा देते. 25 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणा, नवकल्पना आणि बाजारपेठेतील अनुभवासह एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड विविध मालमत्ता वर्गांमध्ये पूर्ण गुंतवणूक आणि वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स देते, ज्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थिती आणि डिजिटल नवोपक्रम यांचा समावेश आहे.
Leave a Reply