एनएनटीआरच्या जंगलात NT-2 वाघिणीच्या छाव्यांचा खेळ ◾️ट्रॅप कॅमेर्‍यातून तीन पिल्लांचा शोध ◾️ व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण यश

Follow Us on :

एनएनटीआरच्या जंगलात NT-2 वाघिणीच्या छाव्यांचा खेळ

◾️ट्रॅप कॅमेर्‍यातून तीन पिल्लांचा शोध

◾️ व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण यश

गोंदिया (प्रमोद नागनाथे ): नवेगाव-नागझिऱ्यात गेल्या काळात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश आले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये NT-1 व NT-2 ह्या वाघीनीला 20 मे 2023 रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये NT-3 या वाघीनीला 11 एप्रिल 2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली.

आणि आता सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो प्राप्त झाला आहे. सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीन ने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. तेव्हा NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती.

ज्यामध्ये Command & Control Room चा महत्वाचा वाटा आहे. तसेच या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पुर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदियाचे क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. (भावसे) , साकोलीचे उपसंचालक पवन जेफ (भावसे), उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई (भावसे), विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, व्ही. के. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, दिलीप कौशीक व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

◾️प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश…

NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. दरम्यान, NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे.

पवन जेफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, साकोली

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए