माहिती व जनसंपर्क विभागाचा डाव,डिजिटल मीडियाला वगळते…आता नागपूर डिजीटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ हायकोर्टात जाणार ! राष्ट्रपति दौरा पास दिली तर पीएम दौरा पास का दिली नाही 

Follow Us on :

माहिती व जनसंपर्क विभागाचा डाव,डिजिटल मीडियाला वगळते…आता नागपूर डिजीटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ हायकोर्टात जाणार ! राष्ट्रपति दौरा पास दिली तर पीएम दौरा पास का दिली नाही 

नागपूर : माहिती व जनसंपर्क विभागाने डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींना डावलण्याचे षडयंत्र रचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा असताना डिजीटल मीडियांच्या प्रतिनिधींना प्रवेशीका देण्यास नकार दिला. त्यामुळे, डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी यांच्या दुजाभाव कृत्या विरोधात चांगलेच खदखदत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात नागपूर डिजीटल मीडिया संघ तक्रार करणार आहे. न्यायालयात या विरोधात याचिका देखिल संघ दाखल करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूरचा नियोजित दौरा ठरला होता. त्यानुसार, नरेंद्र मोदी हे वंदेभारत एक्सप्रेस, समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो व एम्स आदी प्रकल्पांचा शुभारंभ करणार होते. नागपूरच्या माहिती विभागाने एम्स येथे आयोजित कार्यक्रमाचा वृत्त संकलनासाठी इलेक्ट्रॉनिक व प्रिन्ट मीडिया या माध्यमांना प्रवेशीका प्राप्त करण्यासाठी अर्ज मागितले होते. त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक व प्रिन्ट मीडिया आणि न्यूज पोर्टल ने अर्ज दिला. इलेक्ट्रॉनिक व प्रिन्ट मीडियाच्या प्रतिनिधिंना कार्यक्रमाच्या वृत्त संकलनासाठी प्रवेशीका देण्याचे नागपूर माहिती विभागाने देण्याचे ठरविले. पण न्यूज पोर्टलच्या प्रतिनिधिंना प्रवेशीका देण्यासाठी नकार दिला. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रवेशीका देण्याची तारीख येई पर्यंत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा असताना डिजीटल मीडियाला माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून नागपूर शहर पोलीस विभागाने वृत्तसंकलनासाठी प्रवेशीका दिली होती.

मात्र पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिजीटल मीडियांच्या प्रतिनिधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याचे एम्स येथील वृत्तसंकलन करण्यापासून दुर ठेवले. हे संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपूरस्सर केले असल्याची माहिती आहे.

देशातील नागरिकांचा आज डिजीटल माध्यमांवर विश्वास आहे. मोठ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बैनरचा राजीनामा देणाऱ्या संपादकांनी आपला डिजीटल’प्लैटफार्म’तयार केला आहे. त्यांना ऐकणारे व बघणारे मिलेनियम प्रेक्षक आहेत. सत्य समाजापूढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न डिजीटल माध्यम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखिल डिजीटल मीडियाच्या बाजूने आहेत. तर, महाराष्ट्रात डिजीटल मीडियांच्या प्रतिनिधींना का माहिती व जनसंपर्क विभाग डावलण्याचा प्रयत्न करीत आहे, हा डिजीटल युगात चिंतेचा विषय आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी डिजीटल मीडियांच्या प्रतिनिधींनी अर्ज केला आहे.

सुत्राची माहिती आहे की डिजीटल मीडियांच्या प्रतिनिधींना प्रवेशीका मिळणार नाही. हे देखिल प्रथमच होणार आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आहे. अन्यथा, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी यांच्या विरोधात नागपूर डिजीटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करणार आहेत. तसेच, उच्च न्यायालयात याचिका देखिल दाखल करणार आहेत.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए