दीक्षाभूमि स्मारक समिति रद्द करा,बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या हाती द्या -आनंदराज आंबेडकर

Follow Us on :

दीक्षाभूमि स्मारक समिति रद्द करा,बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या हाती द्या -आनंदराज आंबेडकर
नागपुर -रिपब्लिकन सेने चे चीफ आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती वरुन नागपुरचा दौरा केला.सोमवारी रविभवन येथे पत्रकारांसोबत वार्तालाप करतांना म्हटले की दीक्षाभूमि स्मारक समिति रद्द करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ताब्यात द्यावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

रवीभवन पत्रपरिषद आयोजित पत्रपरिषदेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे,जिल्हाध्यक्ष,भूषण भस्मे,धर्मपाल वंजारी,शरद दंढाळे, निलेश खडसन,अरविंद कारेमोरे,अर्पित बागडे,संजय सुखदेवे महेंद्र दिवते,विशाल मानवटकर,सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हटले की नागपूर मधील दीक्षाभूमी हि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ला दिली होती आणि दीक्षाभूमी स्मारक समिती हि फक्त बांधकामापुरती तयार करण्यात आली होती परंतू रा. सु. गवई यांनी आपल्या राजकीय ताकतीचा वापर करून नागपूर धर्मादाय कार्यालयात त्यांचा कोणताही सबंध नसताना आपल्या नावाने नोंदणीकृत केले व तेव्हापासून त्या ठिकाणी गवई आणि फुलझेलेचा परिवार तसेच मनुवादी विचारधारेच्या लोकांना त्या ठिकाणी जागा दिली जाते आणि त्या ठिकाणी एकतर्फी हुकूमशाही या लोकांच्या माध्यमातून होताना दिसत आहे, दीक्षाभूमी चे
सचिव सुधीर फुलझेले हे बिनडोक आहेत आणि स्वताची कौडीची लायकी नसताना आणि वडिलांच्या भरोशावर त्या ठिकाणी बसून आंबेडकर घराण्यावर टीका करतात आणि स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी संघ, भाजपा,काँग्रेस च्या लोकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाला बोलावून पवित्र दीक्षाभूमी ला धम्माचे ठिकाण सोडून राजकारणाचा अड्डा या लोकांनी बनविला आहे आणि राहिला लोकप्रियतेचा प्रश्न तर आम्ही 2024 च्या नागपूर लोकसभेत रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आमची किती लोकप्रियता आहे हे दाखवून देऊ.
आणि आता रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून दीक्षाभूमीला या मनुवादी विचारसरणीच्या लोकांच्या तावडीतून काढून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यात देऊ.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अनेक धर्माचा अभ्यास करून व 1956 ला बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन माना-सन्मामाचा विद्यानवादी बुद्ध धर्माची दिक्षा घेऊन करोडो अनुयायांना बुद्ध धम्म दिला परंतू बिनडोक आणि महामूर्ख कधी काँग्रेस-राष्ट्रवादी तर कधी सेनेचे तर कधी भाजपाचे वैयक्तिक फायद्यासाठी पाय चाटणारा लाचार रामदास आठवले म्हणतो की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बुद्ध धर्माची दिक्षा घेतली,
असे मूर्खतेचे वक्तव्य करुन संपूर्ण आंबेडकरी जनतेचा आठवलेनी अपमान केलाय म्हणून मी या दोघांचा जाहीर निषेध करून यांना सांगू इच्छितो की यापुढे धम्माबद्दल बोलताना तोंडावर झाकन ठेऊन बोलावे.

नागपुरमधील पटवर्धन ग्राउंड वर मागील 22 वर्षापासून आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचा प्रश्न रखडलेला आहे तो त्वरित करून स्मारक बांधावे म्हणून आम्ही मागे ठाकरे सरकारला 3 महिण्याचा अल्टीमेटम दिला होता या दरम्यान ठाकरे सरकार कोसळले त्यामुळे आता पुन्हा 3 महिन्याचा वेळ शिंदे-फडणवीस सरकारला देत आहोत आणि हा सरकारला शेवटचा अल्टीमेटम असेल अन्यथा मुंबई मधील इंदूमिल प्रमाणे या पटवर्धन ग्राउंड चा ताबा सेना स्टाईल ने आम्ही घेऊन आंबेडकरी जनतेच्या पैशातून हे स्मारक आम्ही बांधु म्हणून माझे विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना सांगणे आहे की आपण नागपूर मधील असल्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा आणि सोबतच अंबाझरी येथीलसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सुद्धा बांधावे अन्यथा सेना तर्फे आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रतिसाद राज्यात उमटतील त्याला फडणवीस जबाबदार राहतील.

नागपूर मधील नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत गुंठेवारी मध्ये जे भूखंड आहेत त्याचा विकास त्वरित करून नियमितिकरन करावे जेणेकरून प्लॉट धारकांना बँक कर्ज घेऊन घर निवास बांधता येइल.
विदर्भात जंगल,खनीज,आणि वीज मोठ्या प्रमाणात असून आणि फडणवीस गडकरी सारखे हेवी मंत्री असून सुद्धा इकडील शेतकरी कर्जा अभावी आत्महत्या करतात आणि हा विदर्भ विकासापासून कोसो दूर आहे म्हणून त्यांनी देशा आणि राज्यासोबत सोबत जबाबदारी समजून विदर्भाकडे सुद्धा लक्ष द्यावे.

राज्यातील तसेच नागपूर मधील सरकारी शाळामध्ये असुविधेमुळे विद्यार्थाची संख्या कमी होत आहे म्हणून या शाळा बंद होत आहेत त्याचा फायदा शिक्षन माफियाना होत आहे याचे श्रेय भाजपा सरकारला सरळ सरळ जातानी दिसत आहे म्हणून सरकारने सर्व सरकारी शाळा अत्याधुनिक कराव्या जेणेकरून गरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील.
येणाऱ्या सर्वच निवडणुका रिपब्लिकन सेना लडविणार आहे या अनुसंगाने रिपब्लिकन सेना राज्यात कामाला लागली आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए