नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर कडक निर्बंध; CP विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

Follow Us on :

नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर कडक निर्बंध; CP विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश
नागपूर WH NEWS : शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, बार, क्लब, पब, शाळा-कॉलेज कॅन्टीन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानामुळे इतर नागरिकांना होणारा त्रास आणि आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन संबंधित आस्थापनांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आस्थापनांमध्ये ‘No Smoking’ फलक लावणे, धूम्रपानासाठी परवानगी असलेल्या ठिकाणी नियमानुसार ‘Designated Smoking Area’ तयार करणे आणि त्या ठिकाणी योग्य विभागणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटसंदर्भातील कायद्याचेही पालन करण्याचे निर्देश आहेत.

याशिवाय आस्थापनांमध्ये अंमली पदार्थ किंवा मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांची विक्री अथवा सेवन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहक, महिला, मुले आणि इतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी आस्थापना मालकांवर सोपवण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित तरतुदींनुसार तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते.
हा आदेश 6 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 00:01 वाजेपासून 6 डिसेंबर 2026 रोजी रात्री 24:00 वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाहीचा ईशारा नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. या निर्णयाचे समाजात स्वागत होत आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए